मुंबई

ठाणे न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय प्रणाली

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : मोफत विधी सेवा पात्र असणाऱ्या व्यक्तींना त्यांची बचावाची बाजू न्यायालयासमोर मांडण्यासाठी ठाणे जिल्हा न्यायालयात लोकअभिरक्षक कार्यालय प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे आरोपी तसेच न्यायालयीन बंदी आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नियमन कायदा २०१० अंतर्गत ही सेवा देण्यात येईल. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये सुरू केलेल्या या लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सुधारीत विधी सेवा बचाव पक्षप्रणालीनुसार हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे फौजदारी प्रकरणांमध्ये सरकारतर्फे फिर्यादी पक्षाची बाजू न्यायालयासमोर मांडण्यासाठी शासकीय पोलिस अभियोक्ता, लोकअभियोक्ता यांची नेमणूक होऊन त्या प्रणालीप्रमाणे फौजदारी प्रकरणांचे कामकाज चालते, त्याच धर्तीवर ज्या आरोपीची आर्थिक कुवत नाही किंवा जे न्यायालयीन बंदी आहेत तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (मोफत व सक्षम विधी सेवा) नियमन कायदा २०१० अंतर्गत मोफत विधी सेवा मिळण्यास पात्र आहेत, त्यांची बचावाची बाजू न्यायालयासमोर मांडण्याकरीता लोक अभिरक्षक कार्यालय प्रणालीची सुरूवात करण्यात आली आहे.
या प्रणालीचा उद्देश केवळ मोफत कायदेविषयक सहाय्य देणे नसून मोफत व गुणवत्तायुक्त विधी सहाय्य देणे आहे. त्यामुळे या प्रणालीमध्ये विधिज्ञांच्या नियुक्तीकरीता जिल्हा पातळीवर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, जिल्हा सरकारी वकील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांची समिती गठित करून त्यांच्यामार्फत विधीज्ञांच्या मुलाखती घेण्यात आल्या. गुणवत्तेच्या निकषावर विधिज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार या कार्यालयात उप मुख्य विधी सेवा बचाव पक्ष वकील म्हणून ॲड. सागर कोल्हे, ॲड. संजय गायकवाड, ॲड. संदिप येवले व सहाय्यक विधी सेवा बचाव पक्ष वकील म्हणून ॲड. विशाल अहिरे, ॲड. कन्हैया सोनवलकर, ॲड. रूपसिंग बन्सी, ॲड. अभिराजदास, ॲड. अतुल सरोज, ॲड. शिल्पा बाजी. ॲड. मनिष उज्जैनकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही मोफत विधी सेवा अटक होण्यापूर्वीपासून ते निकाल झाल्यानंतर वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT