मुंबई

गगनगिरी महाराज आश्रमाला रिक्षाचालकांची देणगी

CD

घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) ः घाटकोपरमधील जय गगनगिरी रिक्षा चालक मंडळाने खोपोली येथील गगनगिरी महाराज आश्रमाला आपली देणगी सुपूर्द केली. जय गगनगिरीमधील रिक्षा चालक नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. गोरगरीब जनतेची सेवा, रुग्ण सेवा, रक्तदान, प्रशासकीय मदत अशा प्रकारची कामे ते नेहमीच करताना दिसतात. दरवर्षी साध्या पद्धतीने पूजा घालून अनावश्यक खर्च टाळून ते कार्य करत असतात. या वर्षी बचतीच्या पैशांतून खोपोली येथील गगनगिरी आश्रमात येणाऱ्या भाविकांच्या सुखसोईसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये त्यांनी दिले आहेत.

सापाला पकडण्यात यश
चेंबूर, ता. १५ (बातमीदार) ः चुनाभट्टी येथील गुलमोहर मार्ग परिसरातील विश्वकर्म सोसायटी परिसरातून सापाला पकडण्यात यश आहे. या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तेथील कामगाराला साप दिसला. त्‍याने याबाबत स्थानिक प्रतिनिधी व समाजसेवक जितेंद्र जाधव यांना सांगितले. त्यांनी तात्काळ सर्पमित्र सिद्धार्थ गायकवाड, राहुल जाधव यांना संपर्क केला असता त्‍यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सापाला पकडून ठाण्यातील जंगलात जाऊन सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : पेट्रोल-डिझेलचा पर्याय तयार? वाहनांबाबत गडकरींची मोठी अपडेट, मारुतीनंतर MG, टोयोटाही आणणार नवीन कार

Pune: मॉन्सूनसाठी जपान आणि अमेरिकी संस्थांचा दिलासादायक अंदाज, पॉझिटिव्ह आयओडी पावसासाठी लाभदायी

मैत्री असावी तर अशी! कोरा चेक देत अशोक सराफ म्हणालेले..., नाना पाटेकरांची सांगितलेली आठवण

Pune: नव्या गाडीचे पेढे वाटले, खाल्ल्यानंतर ७ जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंना कळवलं, FDAने घेतले नमुने

Latest Live Updates Marathi: चनोडा शिवारात नर वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, मृत्यूचे कारण अहवालानंतर स्पष्ट होणार

SCROLL FOR NEXT