मुंबई

नापास होण्याच्या भीतीने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १७ : दहावीच्या परीक्षेतील काही विषयांचे पेपर कठीण गेल्यामुळे तणावाखाली आलेल्या एका १५ वर्षीय मुलाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री चेंबूर परिसरात घडली. नापास होण्याच्या भीतीने या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. अनिकेत ठोंबे असे या मुलाचे नाव असून तो चेंबूरच्या विजय नगर परिसरात राहात होता. चेंबूर पोलिसांनी याबाबत मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दहावीच्या परीक्षेत अनिकेतला काही पेपर कठीण गेले होते. त्यामुळे त्याला नापास होण्याची भीती होती. परिणामी, काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. गुरुवारी रात्री त्याची आई घराबाहेर गेली होती. त्यावेळी अनिकेतने घरात गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर आई घरी परतली. यावेळी घर आतून बंद असल्याने तिने अनिकेतला हाक मारली. मात्र त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. यावेळी अनिकेत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

Bihar Crime News : भाजप नेत्याच्या पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, मेहुणा गंभीर जखमी, भर रस्त्यात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Latest Marathi News Live Update : खासदार संजय राऊत पुण्यात येताच वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी

Eknath Shinde Hasan Mushrif : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात एकनाथ शिंदेची एन्ट्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआदी दिल्या सूचना; हसन मुश्रीफांना अप्रत्यक्ष पाठबळ

SCROLL FOR NEXT