मुंबई

गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई ता. १८ : राज्यभरातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप सुरू आहे. पेन्शनच्या मागणीसाठी असलेल्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. अशातच आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे संपकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदारांनी संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात मोर्चे काढून निषेध करण्याचा निर्णय सरकारी, निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी घेतला आहे.

सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी ९५ टक्के सरकारी कर्मचारी बाहेरच्या कमाईवर असतात, असे‌ वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षाचा बेमुदत संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तोल तर ढळलेला नाही ना, असा प्रश्न यावर काटकर यांनी विचारला. आमदार गायकवाड यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. उद्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आमदार गायकवाड यांच्याविरोधात मोर्चे काढून निषेध व्यक्त केला जाईल. कर्मचारी, शिक्षक हिताचा तात्काळ निर्णय जर सरकारने घेतला नाही, तर हे आंदोलन चिघळल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा काटकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT