मुंबई

सणासुदीत कोरोनाचे सावट

CD

वसई, ता. २० (बातमीदार) : वसई-विरार शहरात कोरोनाने डोके पुन्हा वर काढण्यास सुरुवात केली आहे. रविवारी वसई-विरार शहरात चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या सहा दिवसांत १४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून यातील दोन जण बरे झाले आहेत. मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने वसई-विरार महापालिकेचे आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरी, डहाणू, मोखाडा या तालुक्यात तसेच वसई ग्रामीण भागात सध्या एकाही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. तर दुसरीकडे मात्र वसई विरार शहरात रुग्ण आढळत असल्याची महापालिका प्रशासनाने माहिती दिली. राज्यात सध्या कोरोनासह ‘एच३एन२’ या विषाणूचा शिरकाव झाला आहे. अशातच कोरोनामुक्त असलेल्या पालघर जिल्ह्यातील वसई-विरार शहरात कोरोनाचा पुन्हा फैलाव होण्यास सुरुवात झाली झाली आहे.
वसई-विरार शहरात मार्च महिन्यात ताप, खोकला, सर्दी असणारे रुग्ण आढळून येत आहेत. अशात कोरोनाची देखील लक्षणे असलेली रुग्ण पुन्हा आढळत असल्याने कोरोना पुन्हा थैमान घालणार नाही ना अशी चिंता नागरिकांना भेडसावू लागली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. एखादा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यावर त्याला विलगीकरणात ठेवले जाणार आहे. तसेच गरज भासल्यास त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येणार आहेत.
वसई विरारमध्ये १० मार्चला दोन रुग्ण हे कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर गेल्या नऊ दिवसांत हा आकडा वाढत चालला आहे. सध्या शहरात १४ जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील दोन जणांवर उपचार सुरू आहेत. वसई विरार महापालिकेच्या आरोग्य केंद्रात आणि रुग्णालयात कोरोना लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे. तसेच ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही त्यांना प्रत्येक केंद्रातून लस देखील उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी ५०० लसीचे डोस वितरित करण्यात आले आहेत.
-----------------------
नागरिकांनी तोंडाला मास्क लावावे तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच हात स्वच्छ धुवा, कोरोनाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित चाचणी करून घ्यावी. यासाठी आरोग्य केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लसीकरण देखील सुरू आहे.
- भक्ती चौधरी, मुख्य आरोग्य अधिकारी, महापालिका
---------------------
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकाही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. मात्र कोरोनाची लक्षणे दिसली तर त्वरित चाचणी करून निदान करून घ्यावे. तसेच कोरोनाची लागण झाली असेल तर औषधोपचार करावेत.
- डॉ. शशिकांत साळुंखे, साथरोग विभाग , पालघर जिल्हा
---------------
संपाचा फटका
पालघर जिल्हा ग्रामीण विभागातील आरोग्य कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिमेचे नियोजन करणे शक्य होत नाही. मात्र कोरोना रुग्ण आढळले नसल्याने तूर्तास तरी ग्रामीण भागाला दिलासा मिळाला आहे.
----------------
वसई विरारमधील कोरोना बाधित
१० मार्च - २
१२ मार्च - २
१४ मार्च - २
१५ मार्च - २
१६ मार्च - २
१८ मार्च - ४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT