मुंबई

गुढी पाडव्याचा आनंदावर विरजण

CD

नवीन पनवेल, ता. २० (वार्ताहर)ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गोरगरिबांना आनंदाचा शिधा मिळण्याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासनाकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा अजून रेशन दुकानांवर पोहोचला नसल्याने गुढी पाडव्याच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुढीपाडवा, रमजान ईद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १०० रुपयांत हा शिधा वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील ७३ हजार शिधा पत्रिकाधारकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे, पण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळेही शिधावाटप प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता आहे. दिवाळीत अनेक लाभार्थ्यांना दिवाळी उलटून गेल्यानंतरदेखील शिधा मिळाला नव्हता. आता गुढीपाडवा तोंडावर आला असताना अद्याप आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचलेला नसल्याने लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.
--------------------------------
ऑफलाईनने वाटप करणार
दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधा पत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल मिळणार आहे. आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई-पासद्वारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पासची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईनने शिधा दिला जाणार आहे.
---------------------------------
गुढीपाडवा, रमजान ईद तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कालावधीमध्ये या शिधाचे वाटप केले जाणार आहे. जिल्हा स्तरावर शिधावाटप करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- प्रदीप कांबळे, पुरवठा अधिकारी, पनवेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT