मुंबई

जिल्ह्यात सरासरी १.०० मिमी बरसला अवकाळी पाऊस

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : मंगळवारी सकाळीच ढगांच्या गडगडाटात ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. अवघ्या तीन तासांत जिल्ह्यात एकूण ७.६० मि.मी. पावसाची नोंद झाली. या वेळी सर्वाधिक ठाणे तालुक्यात १३.४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे वातावरणात सकाळी चांगला गारवा जाणवत होता. ठाणे शहरात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. ठाणे शहरात सकाळच्या पहिल्या तीन तासांत म्हणजे सकाळी सहा ते आठ या वाजण्याच्या कालावधीत शहरात ८.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मार्च महिन्यात शहरात आतापर्यंत ९.८६ मिमी पाऊस बरसल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतकरीवर्गाचे मात्र नुकसान झाले आहे. हा पडलेला अवकाळी पाऊस मात्र पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाप्रमाणे बरसल्याचे दिसून आले. पहिल्या एक तासात ६.१० मिमी; तर त्यानंतरच्या प्रतितासाला प्रत्येकी ०१.०० मिमी पाऊस पडला आहे. सकाळी पाऊस सुरू झाल्याने शाळकरी मुलांसह पालकांची चांगली धावपळ झाली. या अचानक आलेल्या पावसामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळेत न जाता घरी राहणे पसंत केल्याचे दिसून आले.
.................
ठाणे तालुक्यात सर्वाधिक पाऊस
ठाणे जिल्ह्यात एकूण ७.६० पावसाची नोंद झाली. सर्वाधिक १३.४० मिमी पाऊस ठाणे तालुक्यात झाला असून त्यापाठोपाठ भिवंडी १२.००, अंबरनाथ ९.४०, कल्याण ५.१०, शहापूर ११.१०, मुरबाड १.०० मि.मी. पाऊस पडला. मात्र उल्हासनगर तालुक्यात पावसाची नोंद ही ०.० मि.मी. नोंदवली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Criminal Law: विवाहपूर्व संबंध ठेवणे; सरकारवर टीका करणे गुन्हा ठरणार, नवा कायदा लागू, नव्या तरतुदींमुळे मोठी उलथापालथ

KDMC Election: शिंदेसेनेने डोंबिवलीत खाते उघडले! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा तिहेरी बिनविरोध विजय

January Horoscope 2026: जानेवारी महिन्यात कोणत्या राशींवर राहणार रोचक राजयोग? टॅरो कार्ड्सनुसार जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

SCROLL FOR NEXT