मुंबई

कल्याण अत्रे रंगमंदिरमधील नऊ गाळे सील

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृह संकुलातील भाडेतत्त्‍वावर देण्यात आलेल्या गाळ्यांच्या भाडेकरूंनी अनेक वर्षे थकबाकी भरलेली नव्हती. गाळेधारकांना मालमत्ता विभागाकडून वारंवार तोंडी समज देऊनही गाळ्यांचा भाड्याच्या थकबाकीची रक्कम भरण्यास सदर भाडेकरू टाळाटाळ करत होते. तब्बल ५२ लाख ४९ हजार रुपयांची थकबाकी असल्याने पालिका प्रशासनाने नऊ गाळ्यांवर कारवाई करत ते सील केले.

महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्‍या निर्देशानुसार आणि मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, मालमत्ता विभागाच्या उपअभियंता सीमा आठवले, अधीक्षक भागाजी भांगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांच्या भाड्याची रक्कम थकबाकीसह संबंधित गाळेधारक अदा करत नसतील, तर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT