मुंबई

पालघरमध्ये पर्यावरण विज्ञान प्रदर्शन

CD

पालघर, ता. २२ (बातमीदार) : रोटरी डिस्ट्रिक्ट, क्लब बॉम्बे आणि रोटरी क्लब पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण विज्ञान अभ्यासाद्वारे आत्मनिर्भर भारत या विषयावर म. नी. दांडेकर विद्यालय पालघर येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात तालुक्यातील १८ शाळांनी सहभाग घेतला. यात विद्यार्थ्यांनी पर्यावरण विज्ञान विषयक वेगवेगळे प्रकल्प, त्यांच्या प्रतिकृती, आकृती व माहितीसह सादर केले. यावर्षीपासून रोटरी क्लबतर्फे १८ शाळांमध्ये पर्यावरण हा एक ऐच्छीक विषय सुरू केला असून या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, प्रदूषण व विविध पर्यावरणीय समस्या यावर उपाय करू शकतील अशा कल्पना विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आल्या. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन रोटरीचे जिल्हा संचालक भूपेंद्र शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरण विज्ञान विषयाच्या जिल्हा प्रमुख रितू बागला, उर्मिला प्रभू, राखी सुनील आणि अभय भाटिया हे उपस्थित होते.प्रदर्शनात प्रथम क्रमांक राजगुरू ह. म. पंडित विद्यालय सफाळे, द्वितीय क्रमांक स. का. पाटील विद्यामंदिर माकूनसार तर तृतीय क्रमांक स्वर्गीय तारामती हरिचंद्र पाटील विद्यालय चहाडे यांनी पटकावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT