मुंबई

पारसिक नगरातील खड्डा डोकेदुखी

CD

कळवा, ता. २३ (बातमीदार) : खारेगाव पूर्व घोळाई नगर परिसरात असलेल्या अपर्णाराज सोसायटीच्या बाजूला एका भूखंडावर एका विकासकाने गेल्या सहा महिन्यांपासून खड्डा खोदून अर्धवट सोडून दिला आहे. या खड्ड्यात सध्या सांडपाणी साठून डासांची मोठ्या प्रमाणात पैदास निर्माण झाल्याने घोलाईनगरसह पारसिक नगर परिसरात सध्या डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेंगी, मलेरियासह साथींच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. तरीही महापालिका कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने येथील कळवा पारसिक प्रवासी सामाजिक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पारसिक नगरातील खारेगाव पूर्व घोळाई नगर परिसरात काही भूमाफियांच्या वतीने अनधिकृत व बेकायदा बांधकामे केली जात आहेत. या बांधकामांसाठी हे भूमाफिया खोदकाम करीत असतात काही वेळा महापालिका कारवाई करीत असते. त्यादरम्यान खड्ड्यात साठवलेले पाणी व रेल्वेमार्गाच्या बाजूला असलेल्या गटाराचे सांडपाणी साठून राहते. त्यामुळे तेथे डासांची पैदास निर्माण होते. अपर्णाराज सोसायटीजवळ असलेल्या खड्ड्यात रेल्वे मार्गाच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीमधील कचरा, प्लास्टिक पिशव्या, खरकटे, मोठ्या प्रमाणात टाकल्याने हा कचरा या खड्ड्यात कुजला आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
परिसरातील नागरिकांनी तक्रार करूनही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. सध्या काही ठिकाणी पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी कचरा कुजला आहे. साथीच्या आजारातही वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरातील कचरा उचलण्याचे व हा खड्डा खोदणाऱ्या बांधकाम विकासकावर करवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

---------------------
खारेगाव पूर्व घोळाई नगर परिसरात खड्डा खोदून पाणी साठवण करणाऱ्या बांधकाम विकासकावर कारवाई करावी. तसेच साठलेला कचरा त्वरित न उचलल्यास याविरुद्ध आम्ही आंदोलन करू.
- सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा पारसिक प्रवासी सामाजिक संघटना

-----------------
खारेगाव पूर्व घोळाई नगर परिसरातील कचरा रोज उचलला जातो. ज्या ठिकाणी कचरा साचला असेल तेथे कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात येईल.
- संजीव रणदिवे, स्वच्छता निरीक्षक, ठाणे पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT