मुंबई

यंदा पावणेदोन हजार घरांची बुकिंग

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : मागील दोन ते अडीच वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला होता. त्यानुसार बांधकाम क्षेत्रावरदेखील त्याचा मोठा परिणाम झाला होता; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर सर्वच क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहेत. त्यात यंदाचा गुढीपाडवा बांधकाम क्षेत्रासाठी गोडवा वाढवणारा ठरला आहे. गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर घर घेणाऱ्या इच्छुकांसाठी विविध सवलती देण्यात आल्यामुळे यंदाच्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक हजार ७२३ जणांनी गृहखरेदी केली असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक तथा एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.
अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा आणि दसरा हे साडेतीन मुहूर्त आहेत. या मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर वाहन, गृह खरेदी असो अथवा सोनेखरेदीकडे नागरिकांचा कल वाढत असतो. या मुहूर्तांवर वाहन खरेदी करण्याबरोबरच गृहखरेदी करण्यासाठी नागरिकांचे महिनाभर आधी नियोजन ठरत असते. मागील दोन ते अडीच वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या सर्वच क्षेत्राला आर्थिक मंदीचा मोठा फटका बसला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर सण-उत्सवांवरील निर्बंध राज्य शासनाने उठवल्याने यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात व जल्लोषात गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ठाण्यात गृहखरेदीला तेजी आल्याचे दिसून येत आहे.

-----------------------
यंदाच्या गुढीपाडव्याच्या शुभ दिवसाने ठाणेकरांना त्यांच्या स्वप्नातील घर निवडण्याच्या आणि प्रत्यक्षात आणण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार एमसीएचआय क्रेडियाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक हजार ७२३ जणांनी गृहखरेदी केली असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक तथा एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. रिअल इस्टेट एक्स्पो, प्रॉपर्टी २०२३ ला २७ हजार कुटुंबीयांनी भेटी दिल्याची नोंद करण्यात आली असून ठाण्यात घर खरेदी करण्यात रस दाखवला होता. यापैकी बहुतेकांनी साइटच्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी दीड हजार घरे बुक होतील अशी अशा होती; मात्र १ हजार ७२३ घरे बुकिंग करण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT