मुंबई

जेसीबी चालकावर हल्ल्याचा प्रयत्न

CD

पालघर, ता. २५ (बातमीदार) : पालघरमधील सोनोपंत दांडेकर मार्गावर अनेक ठिकाणी घरमालकांनी अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेले बंगल्याचे कुंपण तोडण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी गेले होते. त्या वेळी जेसीबीचालकावर एका घरातील तरुणाने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस हवालदाराने तरुणास बाजूला हटवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पालघर शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहीम जोरात सुरू झाली आहे. सोनोपंत दांडेकर मार्गावरील काही बंगल्याचे कुंपण हे रस्त्यावर असल्याने नगर परिषदेच्या पथकाने जेसीबीच्या साह्याने ते तोडले. त्या वेळी बंगल्यातील एका तरुणाने पथकातील जेसीबीचालकावर धावून येऊन कोयता उगारला. त्या वेळी बंदोबस्तावर असलेले पोलिस हवालदार रवींद्र गोरे यांनी त्या तरुणास पाठीमागून पकडून जेसीबीचालकावरील होणारा जीवघेणा हल्ला अडवून त्या तरुणास जेरबंद केले. पालघर नगरपालिका क्षेत्रात नगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकावर असा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: किरकोळ बाजारात तूरदाळीचे दर दहा टक्क्यांनी वाढले

Hassan Sex Scandal: माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Sakal Podcast : सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

SCROLL FOR NEXT