मुंबई

टाकाऊतून साकारली टिकाऊ उपकरणे

CD

प्रकाश लिमये, भाईंदर
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत, उपलब्ध साधन सामुग्री यांच्या मदतीने खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करणे शक्य होत असते, पण हीच कमाल मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्‍या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे. तुटपुंज्या साधन सामग्रीच्या मदतीने टाकाऊ वस्तूंमधून या विद्यार्थ्यांनी घरगुती वापराची व शेतीसाठी लागणारी उपकरणे तयार केली आहेत.
महापलिकेच्या काशी शाळा क्रमांक चारमधील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंमधून घरगुती वापराची उपकरणे, तसेच शेतीसाठी खत फवारणी यंत्र तयार केले आहे. त्यांच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सातवीत शिकणाऱ्‍या फैजान पिंजारी याने उन्हाळ्यात थंडगार हवा देणारा घरातील कुलर बघितला आणि असाच कुलर स्वत: बनविण्याचा निर्णय घेतला. मात्र कुलर बनविण्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी हातात पुरेसे पैसे नसल्याचे त्याच्या लक्षात आले. मग घरातला जुना तेलाचा डब्बा त्याने कापला व त्याच्या सभोवताली भंगारमधील तारेची जाळी बसवली व त्याला गवताचे आवरण लावले. त्यातून कुलरचा मुख्य खोका तयार झाला. मग या खोक्याभोवती असणाऱ्या गवतामध्ये पुरेसा ओलावा राहील, अशी व्यवस्थाही त्याने तयार केली. भंगारच्या दुकानातून जुना छोटा पंखा, बारा व्होल्टची बॅटरी त्याने मिळवली आणि छोटेखानी कुलर तयार केला. आता या कुलरमधून थंडगार हवा येत आहे.
शिवम जयस्वाल या विद्यार्थ्याने खत फवारणी यंत्र तयार केले आहे. गावी आपल्या आजोबांना शेतात खत टाकताना होत असलेले कष्ट लक्षात घेऊन बॅटरीवर चालणारे खत फवारणी यंत्र तयार करण्याचे ठरवले. टाकाऊ प्लास्टिकची बाटली, जुना रबरी पाईप, पुठ्ठा, जुनी बॅटरी व मोटर यांच्या साह्याने शिवमने हे फवारणी यंत्र बनवले आहे; तर शुभम मळेकर या विद्यार्थ्याने जुन्या बॅटरी, मोटार व पंखा याच्या मदतीने थेट रिमोटवर चालणारा पंखा तयार केला आहे. तयार केलेली ही उपकरणे या विद्यार्थ्यांनी नुकतीच आयुक्त दिलीप ढोले यांना दाखवली.
.....
आयुक्तही भारावले
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये असलेले हे कलागुण पाहून आयुक्तही भारावून गेले. तसेच त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली. विद्यार्थ्यांना यापुढे असेच अभिनव प्रयोग करण्यासाठी पैशांची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांना असे प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून काही निधी राखीव ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्‍यांना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT