मुंबई

जलबचतीचा संदेश

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ ः जलजागृती सप्ताहानिमित्त आयोजित वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून तब्बल ३५ हजार शाळकरी मुलांनी जलबचतीचा संदेश दिला. आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्फत महापालिकेच्या सर्व सोशल मीडियावरून नागरिकांना जलबचतीचे आवाहन करण्यात आले. याशिवाय शहरात ठिकठिकाणी होर्डिंग प्रसारित करण्यात आले. हस्तपत्रके वितरित करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या एलईडी स्क्रीनवर जलबचतीचा संदेश प्रसिद्ध करण्यात आला.
पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच कळावे, याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या सर्व ७९ शाळांमध्ये जलबचत विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या ५६ प्राथमिक व २३ माध्यमिक शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी आकर्षक हस्तफलक तयार करून त्यावर जलबचतीचे संदेश रेखाटले. काही शाळांमध्ये पाण्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या विषयांवर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते.

चौकांमध्ये जलजागृतीपर पथनाट्ये
विद्यार्थ्यांवर जलबचतीचे संस्कार करण्यासोबतच पालकसभा घेऊन पाणी बचतीचा संदेश प्रसारित करण्यात आला. अनेक शाळांनी आपापल्या परिसरात जलजागृती करणाऱ्या प्रभातफेऱ्या काढून ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ अशा विविध प्रकारच्या घोषणा देत जनसामान्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले. काही शाळांमध्ये पाणी बचतीवर भाषणे तर दोन शाळांमध्ये पारंपरिक कीर्तनेही सादर झाली. काही शाळांनी आपल्या परिसरातील मुख्य रस्त्यांवर तसेच मुख्य चौकांमध्ये जलजागृतीपर पथनाट्ये सादर केली.

सामुहिक जलप्रतिज्ञा
शहरातील महापालिकेच्या सर्व ७९ शाळांमध्ये पाणीबचतीची सामुहिक जलप्रतिज्ञा घेण्यात आली. प्रतिज्ञेनंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व सांगत पाण्याचा उपव्यय टाळणे, पाणी बचत याविषयी सविस्तर माहिती दिली. नवी मुंबई महापालिका शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळेतील कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी तसेच ३५ हजारहून अधिक मुलांनी एकत्र येत जलबचतीचे महत्त्व अधोरेखित केले व जलबचत सप्ताह उत्साहात साजरा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT