मुंबई

अस्वच्छता करणाऱ्यांवर ‘स्वच्छता दूतां’चा वॉच

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः जनजागृती करूनही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, घाण करणे या सवयी जात नाहीत. त्यामुळे आता अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डांत प्रत्येकी ५० प्रमाणे १,२०० स्वच्छता दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कोविड काळात आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या कोरोना योद्ध्यांना स्वच्छता दूत म्हणून सहा महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर सेवेत घेण्यात येणार आहे.
पालिकेने मुंबईतील २४ वॉर्डांत क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली होती. सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, घाण करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात होता; मात्र कोरोना काळात तोंडावर मास्क नसल्याचे कारण देत क्लीनअप मार्शलनी वसुलीचा धंदा सुरू केल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन क्लीनअप मार्शलची सेवा खंडित केली. आता स्वच्छता दूत तैनात होणार आहेत. स्वच्छता दूत कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करणार नाहीत.
पालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर उंचावण्यासाठी स्वच्छता दूत योजना राबवण्यात येत आहे. बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना स्वच्छता दूत म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. नियुक्ती झाल्यानंतर पुढील सहा महिने स्वच्छता दूतांच्या कामावर लक्ष ठेवत कार्यपद्धती योग्य असल्यास कंत्राट कालावधीत वाढ करण्यात येईल, असे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
...
जबाबदारी कोणती?
मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी काम करतात, त्यांच्यावर देखरेख ठेवणे, एखाद्या ठिकाणी कचरा जमा झाला, त्याबाबत संबंधित विभाग कार्यालयात तक्रार करणे, कचऱ्यासंदर्भात तक्रार असल्यास त्याची पालिकेच्या कंट्रोल रूमला माहिती देणे अशा प्रकारची जबाबदारी या स्वच्छता दूतांची असेल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT