मुंबई

आज जागतिक रंगभूमी दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार..!

CD

मुंबई, ता. २६ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ५२ नाट्यगृहे सर्व सोयी-सुविधांसह सुसज्ज करण्यासाठी सांस्कृतिक विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जागतिक रंगभूमी दिननिमित्त सर्व रंगकर्मी, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व रंगभूमीशी नाते असलेल्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ५२ नाट्यगृहे सर्व सोयी-सुविधांसह सुसज्ज व्हावीत, रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलावंत दोन्ही बाजूंचा विचार करून मराठी नाट्य चळवळ मोठी व्हावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे. यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग कटिबद्ध आहे; नाट्य मंदिराचे नाट्यचित्र मंदिर करता येईल का, यावरदेखील विचार सुरू आहे. नाट्यगृह बांधताना किंवा नूतनीकरण करताना तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. राज्यातील नाट्यगृहांची स्थिती आणि उद्भवणाऱ्या अडचणी याबाबत बैठकी घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. ५२ पैकी रवींद्र नाट्यगृह सांकृतिक विभागाकडे असून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहेत. यासंदर्भातील अडचणी दूर करून नाट्यगृह अधिक उत्तम व आदर्श करण्याच्या दृष्टीने सूचना देऊन यासंदर्भातील तज्ज्ञ व कलावंत यांच्यासोबतदेखील चर्चा झाली आहे. नाट्यगृहात सौरऊर्जेची व्यवस्था व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न आहे.
----
नाट्यगृह सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणार
कोरोनाच्या काळात मराठी नाटक आणि कलावंत यांच्यावरदेखील इतर क्षेत्रांप्रमाणे आर्थिक संकट कोसळले. आता हे क्षेत्र रुळावर येऊ लागले आहे, तरीदेखील मुंबईतील नाट्यगृहे जून २०२३ पर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावीत, यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याशी चर्चा केली. अल्प दरात हौशी कलावंतांना नाट्यगृहे उपलब्ध व्हावीत, असाही प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. नाट्य स्पर्धेच्या परीक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आणि स्पर्धेतील विजेत्या संघातील प्रत्येक कलाकाराला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे ते म्हणाले.

----
आधुनिक करण्यासाठी प्रयत्न
नाट्य चळवळ सुरू राहावी, याकरिता राज्यातील नाट्यगृह आधुनिक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करताना नाट्यगृहांमध्ये सोलर, एअर कंडिशन व्यवस्था, साऊंड सिस्टीम, नाट्यगृहाच्या खुर्च्या, मेकअप रूम, प्रकाशव्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, पार्किंग या सगळ्या बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT