मुंबई

ग्रामीण भागात गॅस सिलिंडर शोभेलाच

CD

जव्हार, ता. २७ (बातमीदार) : आदिवासीबहुल अशा जव्हार तालुक्यात केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीच्या काळात लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले. तसेच लाभार्थ्यांचा या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला, पण सध्या गॅस सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे ग्रामीण भागात गॅस सिलिंडर केवळ शोभेलाच उरले असून केवळ ४० टक्के महिला लाभार्थी या गॅस सिलिंडरचा वापर करत आहेत, तर उर्वरित महिला चुलींचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.
केंद्र सरकारने रॉकेल बंद करून सर्वांनी गॅसचा वापर करावा, यासाठी दारिद्र्यरेषेखालील महिलांना केवळ शंभर रुपयांमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन दिले होते. यामुळे ग्रामीण भागातदेखील गॅसधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. ग्रामीण भागात घरोघरी गॅस कनेक्शन झाले असले तरी दररोज गॅसचा क्वचितच वापर होताना दिसत आहे.
जून २०२२ पासून आठ महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १५३ रुपयांची वाढ झाली. गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे त्याचा वापर करणे सर्वसामान्यांना परवडत नाही. यामुळे ग्रामीणसह शहरी भागात शेतकरी व मजूर वर्गाने गॅसला फाटा दिल्याचे चित्र आहे. मागील आठ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या भावात दीडशे रुपयांपेक्षा जास्त भाववाढ झाली. यामुळे ग्रामीण भागातील गॅसधारकांकडून गॅसऐवजी पुन्हा चुलीला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.
......
गॅसचा ४० टक्के लाभार्थ्यांकडून वापर
जव्हार तालुक्यात बारा हजारच्या आसपास उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी असून केवळ ४० टक्के लाभार्थी गॅस भरून घेत असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
.....
गेल्या वर्षभरात सिलिंडरचे दर
महिना- दर
एप्रिल - ९७५
मे -९७५
जून -९७५
जुलै -१,०६९
ऑगस्ट - १,०६९
सप्टेंबर -१,०६९
ऑक्टोबर - १,०७८
नोव्हेंबर - १,०७८
डिसेंबर - १,०७८
जानेवारी (२०२३) -१,०७८
फेब्रुवारी (२०२३) - १,०७८
मार्च (२०२३) - ११२८
....
मागील काही महिन्यांत गॅस सिलिंडरचे दर वारंवार वाढत असल्याने ग्रामीण भागातील गॅसधारक गॅस सिलिंडर घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. याला पर्याय म्हणून स्वयंपाक व इतर गोष्टींसाठी चुलीचा वापर केला जात असून प्रदूषण वाढून महिलांना धुराचा त्रास जाणवत आहे.
- कल्पना साठे, गृहिणी
....
तालुक्यात आधीच रोजगाराच्या संधींची समस्या, त्यात भरमसाठ गॅस सिलिंडर दरवाढ या सगळ्यांमुळे चुलीच्या धुराला स्वीकारले जात आहे.
- लता सातपुते, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

Asian Games 2026: चीनने शतक झळकावले! भारत पदकतालिकेत रेंगाळतोय; जपान, कोरिया, कझाकस्तानही पुढे; आपण कुठे आहोत?

Nagpur DJ Ban : डीजेच्या मनमानीला आता डीसीपी-एसीपीही जबाबदार; नागपूर खंडपीठाचे पोलिस आयुक्तांना नव्याने अधिसूचनेचे निर्देश

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग आणणार : संजय राऊत

Badrinath Char Dham Yatra: बद्रीनाथ धाममध्ये भक्तीचा नवा महाविक्रम; इतिहासात पहिल्यांदाच तब्बल १७.७९ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

SCROLL FOR NEXT