मुंबई

राजीव गांधी नगरला पालिकेची नोटीस

CD

धारावी, ता. २७ (बातमीदार) : धारावीतील राजीव गांधी नगर येथील झोपडीधारकांना महापालिकेच्या जी उत्तर विभागातर्फे राहत्या घराचे पुरावे सादर करण्याच्या नोटिसा नुकत्याच देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्‍ये गोंधळाचे वातावरण असून यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या मुंबई अध्यक्षा साम्या कोरडे यांनी रहिवाशांशी संबंधित पालिका अधिकाऱ्यांची सोमवारी (ता. २७) भेट घेतली. या वेळी राहत्‍या घराचे पुरावे सादर करण्याचा कालावधी वाढवावा, अशी मागणी केली.
मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडून धारावीतील मिठी नदीलगतच्या ९९० झोपडीधारकांना सात दिवसांच्या आत घराची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस नुकतीच पाठवण्यात आली आहे. मिठी नदी विकास प्रकल्पांतर्गत मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, मलनिःसारण वहिनी टाकणे, इंटरसेप्टरचे बांधकाम, संरक्षक भिंत, सेवा रस्ता बनवण्याचे काम प्रस्तावित असून पालिकेने हा प्रकल्प अत्यावश्यक नागरी प्रकल्प म्हणून घोषित केला आहे.
राजीव गांधी नगर येथील रहिवाशांना अशी नोटीस प्राप्त झाली असता येथील रहिवाशांसह कोरडे यांनी जी उत्तर विभाग परिमंडळ-१ चे सहायक अभियंता राहुल जाधव यांची भेट घेऊन प्रकल्पबाधित घरांचे पुनर्वसन, मिठी नदी विकास प्रकल्प याबद्दल माहिती घेऊन चर्चा केली. झोपडीधारकांना कागदपत्रे जमा करण्याचा कालावधी वाढवून मिळावा, अशी मागणी अधिकाऱ्यांना केली गेली. रहिवाशांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन या वेळी साम्या कोरडे यांनी नागरिकांना केले आहे.

नोटीस का?
मिठी नदी विकास प्रकल्पांतर्गत नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, मलनिःसारण वहिनी टाकणे, इंटरसेप्टरचे बांधकाम, संरक्षक भिंत, सेवा रस्ता बनवण्याचे काम प्रस्तावित असून पालिकेने हा प्रकल्प अत्यावश्यक नागरी प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. त्‍या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना नोटीस पाठवली आहे.

सहायक अभियंता राहुल जाधव यांची भेट घेऊन प्रकल्पबाधित घरांचे पुनर्वसन, मिठी नदी विकास प्रकल्प याबद्दल चर्चा केली. झोपडीधारकांना कागदपत्रे जमा करण्याचा कालावधी वाढवून मिळावा, अशी मागणी अधिकाऱ्यांना केली असून रहिवाशांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
- साम्या कोरडे, अध्‍यक्षा, पुरोगामी विद्यार्थी संघटना, शेतकरी कामगार पक्ष

रहिवाशांनी कागदपत्रे जमा करावीत, त्यानंतर परिशिष्ट तयार केले जाणार आहे. आज भेटलेल्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा केली आहे. नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे.
- राहुल जाधव, सहायक अभियंता, जी उत्तर विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT