मुंबई

नालासोपाऱ्यात २५ लाखांचे एमडी जप्त

CD

नालासोपारा, ता. २७ (बातमीदार) : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १२६ ग्रॅम वजनाचे २५.२० लाख रुपयांचे एमडी (मॅफेड्रॉन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आले. संशयित आरोपी गीतेश अनंत प्रभू (रा. टिटवाळा) याच्याविरोधात तुलिंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

नालासोपारा पूर्वेतील सेंट्रल पार्क येथे एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (ता. २५) सापळा रचला असता गणेश अपार्टमेंटजवळ एक व्यक्ती थैली घेऊन संशयितरीत्या उभा असल्याचे निदर्शनात आले. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी झाडाझडती घेतली असता, त्याच्या बॅगमध्ये अमली पदार्थ असल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासणीत एमडी (मॅफेड्रॉन) नावाचे अमली पदार्थ असल्याचे समोर आले. तसेच त्याची बाजारभाव किंमत २५ लाख २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT