मुंबई

खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा रस्त्यांवर कब्जा

CD

घणसोली, ता. २८ (बातमीदार)ः शहरातील अनेक ठिकाणी रस्ते, चौक, बस स्थानके, रेल्वे स्थानक, पदपथांवर हातगाड्या, स्टॉल्स मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या गाड्यांमुळे घणसोली विभागात कोंडीचा मोठा अडथळा निर्माण होत असून पालिकेच्या कारवाईला जुमानत नसल्याचे दिसत आहे.
घणसोली विभागात अगोदरच अस्ताव्यस्त लावलेल्या गाड्यांमुळे, बेकायदा पार्किंगमुळे रस्ते व्यापून गेले असताना विभागात रस्त्याच्या कडेला हातगाड्यांची संख्या वाढत चालली आहे. घणसोली स्टेशनलगत नेहमीच वर्दळ असते; मात्र या ठिकाणी बसणाऱ्या फेरीवाल्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथांवर कब्जा केला असून अतिक्रमणामुळे कोंडी होऊ लागली आहे.
----------------------
घणसोली विभागात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. कारवाई केली तरी पुन्हा त्या ठिकाणी फेरीवाले बसतात.
- संतोष शिलम, अतिक्रमण अधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT