मुंबई

आधार-पॅन कार्ड लिंक करण्याबाबत संभ्रमावस्था

CD

बोर्डी, ता. २८ (बातमीदार) : आधार कार्ड पॅन कार्ड व निवडणूक ओळखपत्र ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक अनिवार्य करण्यात आले आहे, पण याविषयी नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. या भागातील अनेक लोकांनी आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक केलेले नसल्यामुळे ग्रामस्थ संभ्रमावस्थेत आहेत. ३१ मार्चपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यातच यापुढे निवडणूक ओळखपत्र लिंक करायचे असल्याने नक्की काय करावे, अशा द्विधा मनस्थितीत नागरिक भरकटत आहेत. दरम्यान, यासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा भुर्दंड पडत आहे. घरातील चार पाच माणसांचे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायचे असल्यास एवढी मोठी रक्कम कुठून आणायची असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, याबाबतची तांत्रिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थ सायबर कॅफेवर गर्दी करू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT