मुंबई

डासांमुळे म्हाडा कॉलनीतील रहिवाशी हैराण

CD

मुलुंड, ता. २९ (बातमीदार) ः मुलुंड पूर्व येथील म्हाडा कॉलनी परिसरातील नाल्यात गवत वाढल्याने व कचरा अडकल्याने खाडीत जेथे पाणी सोडले जाते तेथे अडसर निर्माण झाला आहे. यामुळे येथे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा त्रास म्‍हाडा कॉलनीतील रहिवाशांना होत असून यावर तातडीने उपाय करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुलुंड पूर्वेस जयहिंद कॉलनी, टाटा कॉलनी येथून वाहत येणारा नाला, तर दुसऱ्या बाजूने नीलम नगर, दीनदयाळनगर येथील वाहणारा नाला म्हाडामध्ये येऊन खाडीत सोडला जातो. टाटा पॉवर कंपनीच्‍या टॉवरचे काम करण्यासाठी तीन महिन्‍यांपूर्वी भर टाकून रस्ता केला होता. त्यामुळे पाणी तुंबले होते. याबाबतच्या तक्रारी म्हाडा रेसिडेंट कॉलनी असोसिएशनचे अध्यक्ष रवी नाईक यांनी वन विभाग अधिकारी व टाटा पॉवरकडे केली असता त्‍यावर उपाय करण्यात आला; मात्र डासांचा प्रादुर्भाव कमी झाला नाही, त्‍यावर वन विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी पाहणी केली व पाहणीत नाल्यात कचरा अडकल्याने पाणी प्रवाहित नसल्याचे लक्षात आले. त्‍यावर नाले विभाग मध्यवर्ती यंत्रणा येथील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी सफाईसाठी पाच दिवस माणसे पाठवली; परंतु पुरेसे मनुष्यबळ न पाठवल्याने फक्त १३ सोसायट्यांपैकी दोन सोसायट्यांमागील गवत व कचरा काढला गेला. मात्र अद्यापही प्रश्‍न जैसे थे असल्‍याने नागरिकांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

पालकमंत्र्यांना साकडे
नालेसफाईची प्रक्रिया दर वर्षी केली जाते. याबाबत गेल्या वर्षी आमदार मिहिर कोटेचा यांनी अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे हा विषय मांडला होता त्या वेळी याबाबत आश्वासन देण्यात आले. यंदा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या जनता दरबारमध्ये यासंबंधात लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र पालिकेच्‍या सफाई विभागाकडून होत असलेले काम अपुरे असल्‍याचे स्‍थानिकांचे मत आहे.

नागरिक सातत्याने याबाबत तक्रारी करत आहेत. येथे डासांचा प्रादुर्भाव वाढल्‍याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महापालिका या कामाबाबत सहकार्य करत आहे; परंतु ही समस्या युद्धपातळीवर मार्गी लावावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
– विजय देसाई, नागरिक

लवकरच काम होईल
पालिका लवकरच हे काम युद्धपातळीवर सुरू करणार आहे. सध्या पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे हे काम अडले आहे. मात्र लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्‍वाही पालिकेकडून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT