मुंबई

१० वर्षाच्या मुलीवर वाडिया रुग्णालयात उपचार

CD

मुलीच्या पोटातून काढला केसांचा गोळा
१० वर्षांच्या मुलीवर वाडिया रुग्णालयात उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : एका १० वर्षांच्या मुलीच्या पोटातून १०० ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा डॉक्टरांनी काढला. बाई जेरबाई वाडिया रुग्णालय फॉर चिल्ड्रन येथे यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली. या मुलीला ट्रायकोफेगियास, ट्रायकोटिलोमॅनिया (स्वतःचे केस ओढणे) हा आजार आहे. या आजारात तिने ओढलेले केस खाल्ल्याने हा गोळा पोटात तयार झाला होता, असे डॉक्‍टरांनी सांगितले. यामुळे तिला पोटात तीव्र वेदना होत होत्या. या मुलीवर २ तास शस्त्रक्रिया केली गेली.
दादर येथील कियारा बन्सल (नाव बदलले आहे) हिला वयाच्या ९ व्या वर्षी मासिक पाळी आली म्हणून ती औषधे घेत होती. तिला खूप रक्तस्राव होत होता आणि त्यानंतर एक वर्षापेक्षा जास्त काळ पोटदुखी होती. तिला उलट्या होणे, हालचाल करताना वेदना जाणवणे, वजन कमी होणे यासारखी इतर कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे आढळून आली नव्हती.
तिची अल्ट्रासाऊंड तपासणी झाली. त्यानंतर या वेदना मेसेंटरिक लिम्फॅडेनायटिसशी संबंधित असल्याचे समजले. ज्यामुळे ओटीपोटाच्या लिम्फ नोड्सला सूज आली होती. रुग्णाला पोटाला स्पर्श केल्यावर गाठ असल्याचे जाणवले. त्यानंतर नातेवाईकांनी उपचारांसाठी मुलीला वाडिया रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्‍यावर यशस्‍वी उपचार झाले.

काय आहे हा आजार
मुलांमध्ये हे क्वचितच दिसून येते. या रुग्णाला ट्रायकोटिलोमॅनिया (अशी स्थिती ज्यामध्ये स्वतःचेच केस काढण्याची तीव्र इच्छा निर्माण होते). तिला ट्रायकोपागियाचा त्रासही होता, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःचे केस खाते. तपासणीनंतर तिला गॅस्ट्रोटॉमी आणि केसांचा गोळा काढून टाकण्यासाठी लॅपरोटॉमीचा सल्ला देण्यात आला.

अशी केली शस्‍त्रक्रिया
गॅस्ट्रोटॉमी म्हणजे बेझोअर काढून टाकण्यासाठी पोटात एक छिद्र तयार करावे लागते.
या प्रकरणात ट्रायकोबेझोअर हे गिळलेल्या केसांपासून बनलेले वस्तुमान होते.
ही प्रक्रिया सुमारे २ तास चालली आणि त्यानंतर १०० ग्रॅम वजनाचा हेअरबॉल काढला.
तिच्यावर योग्य वेळी उपचार न केल्यास आतड्यांसंबंधी समस्या किंवा आतड्यांना छिद्र पडणे म्हणजेच पोटाच्या भिंतीला छिद्र आणि लहान आतड्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकली असती.

क्लिनिकल तपासणीत आम्हाला पोटात गाठ असल्याचे जाणवले. ओटीपोटात दुखत असलेले रुग्ण नियमितपणे येतात, परंतु तेथे गाठ जाणवत नाही. आम्ही एक सीटी स्कॅन केले ज्यामध्ये ट्रायकोबेझोअर दिसले, जो पोटातील केसांचा गोळा होता आणि त्याचा काही भाग ड्युओडेनममध्ये (लहान आतड्याचा पहिला भाग) दिसून आला. केस विरघळण्यास सक्षम नसतात, म्हणून ते पचनसंस्थेत राहतात. ते काढण्यासाठी शस्‍त्रक्रिया करावी लागते.
- डॉ. पराग करकेरा, बाल शल्यचिकित्सक

रुग्णांच्या उपचारांसाठी चांगल्या दर्जाची अत्याधुनिक उपकरणे रुग्णालयात उपलब्ध आहेत. त्यातून अनेक कठीण यशस्‍वी शस्त्रक्रिया केल्या जातात.
- डॉ. मिनी बोधनवाला, कार्यकारी प्रमुख, वाडिया रुग्णालय
...............................................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

SCROLL FOR NEXT