मुंबई

भिवंडीत रामजन्मोत्सव धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

CD

भिवंडी, ता. ३० (बातमीदार) : भिवंडी शहरासह ग्रामीण भागात रामनवमीनिमित्ताने विविध कार्यक्रमांद्वारे आज (ता. ३०) रामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

शहर बाजारपेठेमधील राममंदिर सुमारे ३५० वर्षे जुने असून या मंदिरात सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी रामजन्माचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप आणि सायंकाळी पालखी सोहळा पार पडला; तर पद्मानगर येथे तेलगू पद्मशाली मंदिरात सकाळपासून जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी भिवंडी पालिकेचे सभागृह नेता सुमीत पाटील यांच्यासह भाजप शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दर्शनासाठी भेट घेऊन उत्सवात सहभागी झाले.

ग्रामीण भागातील अंजूर गावात रामनवमीनिमित्ताने यात्रा भरली होती; तर खारबाव गावातील राम मंदिराचा ८२ वा वर्धापनदिन नागरिकांच्या वतीने गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी वज्रेश्वरीच्या एकसाल येथील मोरेश्वर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. टाळ, मृदुंग, शंखांच्या गजरात भक्तिमय वातावरणात रामनवमी साजरी करण्यात आली. या वेळी भक्तांची मांदियाळी होती. रामभक्तांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सायंकाळी पालखीचे आयोजनही करण्यात आले होते.

मनसेच्या वतीने डोंबिवलीमध्ये महाआरती
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : रामनवमीनिमित्त डोंबिवली मनसेच्या वतीने महाआरती करत रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. कल्याण, डोंबिवली शहरांत मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवलीमधील इंदिरा चौकात मनसेच्या वतीने चलत् चित्र देखावा साकारण्यात आला असून तो पाहण्यासाठी डोंबिवलीकर गर्दी करत आहेत. आज रामनवमीच्या निमित्ताने रामजन्माच्या मुहूर्तावर मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्या उपस्थितीत इंदिरा चौकात महाआरती करत रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT