मुंबई

बोल बजरंग बली की जय

CD

तुर्भे, ता. ६ (बातमीदार) : रामनवमीनंतर येणाऱ्या हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी दिवाळे गावातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदिरातही जन्मोत्सव सोहळा भक्तिभावात साजरा करण्यात आला.
हनुमान जयंती निमित्ताने दिवाळे गावातील मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, मूर्तीला शेंदूरलेपन; तर मंदिराबाहेरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्यादरम्यान सकाळपासून भजन, ब्रास बॅण्ड पथकांचे सुश्राव्य वादन, आनंद सिंग आणि परिवार यांचे धार्मिक सुंदरकांड असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडले. या भव्य सोहळ्यासाठी दिवाळे ग्रामस्थ आणि परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या वेळी हनुमान मंदिरापासून ते गाव प्रदक्षिणा पालखी (मिरवणूक) काढण्यात आली होती; तर सोहळ्याच्या दिवशी दोन्ही वेळेस महाप्रसादाची संपूर्ण व्यवस्था हनुमान सेवा संस्था व समस्त दिवाळे ग्रामस्थ मंडळ दिवाळे यांच्या वतीने करण्यात आली होती. या हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचा अभिषेक व पूजेचे मानकरी म्हणून गावातील बोस कुटुंबीय (वळकरी) यांना देण्यात आला होता.
------------------------------------
हनुमानाच्या मूर्तीस महाअभिषेक, हनुमान चालिसा पाठ, रामनामाचा जप व आरती करून विधिवत पूजा करण्यात आली. याचबरोबर सूर्योदयाच्या वेळी उपस्थित भाविकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करून व पाळणा हलवून संकटमोचन ‘हनुमान की जय, जय श्रीराम’च्या जयघोषातील भक्तिमय वातावरणात हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT