ganapti
ganapti  sakal
मुंबई

पेणच्या बाप्पाची परदेशवारी; ३ हजार ५०० गणेशमूर्ती अमेरिका, दक्षिण आफ्रिका, दुबईसह वेस्ट इंडिजला रवाना

राजेश कांबळे

राजेश कांबळे

पेण : बाप्पाचे माहेरघर असलेल्‍या पेणमध्ये वर्षभर मूर्ती घडवण्याचे काम सुरू असते. देशाबरोबरच विदेशातूनही पेणच्या मूर्तींना गणेशभक्‍तांची विशेष पसंती आहे. त्‍यामुळे आतापासून बुकिंगही सुरू झाले असून बाप्पाची परदेशवारीही सुरू झाली आहे. येत्‍या दहा दिवसांत तब्बल ३ हजार ५०० गणेशमूर्ती अमेरिका, दक्षिण आफ्रिका, दुबईसह वेस्ट इंडिजला रवाना होणार आहेत.

साधारणपणे एक ते पाच फूट उंचीच्या गणेशमूर्तीचे पेण शहरातील कृष्णा कला केंद्रातून परदेशवारीसाठी बॉक्स पॅकिंग झाले आहेत. या मूर्ती जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे मागणीनुसार त्या त्या देशात रवाना होणार आहेत. २०२३ वर्षांच्या सुरुवातीलाच, जानेवारीमध्ये पहिली ऑर्डर आली असून त्‍या गणेशमूर्ती परदेशात रवानाही करण्यात आल्‍या आहेत.

त्यानंतर सर्वात मोठी ऑर्डर वेस्ट इंडिजमधून असून या मूर्तींचेही परदेशवारीसाठी पॅकिंग सुरू आहे. साधारण २० एप्रिलपर्यंत त्‍या कंटेनरमधून समुद्रमार्गे पाठवल्‍या जातील. अनिवासी भारतीयांच्या मागणीनुसार, सध्या मूर्तिशाळांमध्ये ऑर्डर पूर्ण करण्यावर भर दिला जात असून त्‍यासाठी कारागिरांची लगबग सुरू झाली आहे.

या वर्षी पंधरा दिवस उशिराने गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे. पेणमधील कला केंद्रात मूर्ती घडवणे, रंगकाम, नक्षीकाम, वस्‍त्रालंकार, अस्‍त्रालंकाराचा साज, रेखीव आभूषणांचा साज चढवण्यात कारागीर मग्‍न आहेत. सुबक, आकर्षक रंगसंगतीच्या गणेशमूर्ती मागणीनुसार परदेशातील गणेशभक्तांकडे ४० ते ४५ दिवसांत समुद्री प्रवास करून सुखरूप पोहोचणार आहेत.

गणेशोत्‍सव आनंदात, निर्विघ्‍न साजरा करता यावा, म्‍हणून जानेवारी-फेब्रुवारीपासूनच अनिवासी भारतीयांकडून गणेशमूर्तींसाठी बुकिंग सुरू होते. कुणाला मुकुटधारी बाप्पा हवा, तर कुणी फेटेवाल्‍या बाप्पाची ऑर्डर देतात. काही भक्‍त साज-शृंगार, रेखीव वस्‍त्र-अस्‍त्र असलेल्‍या मूर्तींचे बुकिंग करतात, तर काही साधी गणेशमूर्ती घेउन त्‍यावर दागदागिने, मोती-माळा, पितांबराचा साज चढवतात.


पावसाळ्यात समुद्र खवळतो, अतिवृष्‍टी झाल्‍यास वाहतूक बंद होते. मूर्ती वाळण्यास विलंब लागतो. वीज पुरवठा खंडित झाल्‍यास काम ठप्प होते. त्‍यामुळे एप्रिल महिन्याअखेर परदेशातील ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण करण्याकडे मूर्तिकारांचा कल असतो. मे महिन्यात वातावरण अचानक बदलते, अनेकदा वादळी वाऱ्यासह पाऊसही येतो. बाप्पाचा सुरक्षित व सुखरूप प्रवास व्हावा यासाठी परदेशातील जास्तीत जास्त ऑर्डर एप्रिल महिन्यात पाठवून देण्यासाठी मूर्ती कारखानदार भर देतात.

यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच परदेशातील अनिवासी भारतीयांनी गणेशमूर्तींच्या बुकिंग केले आहे. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात गणेशमूर्ती परदेशात रवाना होतील. भारताप्रमाणेच आता परदेशातही गणेशोत्‍सव भव्य-दिव्य प्रमाणात उत्‍साहात साजरा केला जातो. या वर्षी एप्रिलपर्यंत साधारणपणे १० हजारांच्या वर गणेशमूर्ती रवाना होणार आहेत. परदेशात गणेशमूर्ती पाठविण्यासाठी व्यवस्थितपणे पॅकिंग करून समुद्रमार्गे रवाना करण्यात येत आहेत.
- मंगेश पवार, कृष्ण कला केंद्र, पेण

कार्यशाळांमध्ये पॅकिंगची लगबग
कोरोनाकाळात जवळपास २५ हजार मूर्ती परदेशात रवाना करण्यात अडचणी आल्‍या होत्‍या. त्‍यामुळे मूर्ती कारखानदारांचे मोठे नुकसान झाले होते. आताही कोरोना रुग्‍ण वाढू लागल्‍याने आरोग्‍य विभाग सतर्क झाला आहे. त्‍यामुळे परदेशातील गणेशमूर्ती लवकरात लवकर रवाना करण्यावर भर दिला जात आहे. चाळीस फूट कंटेनरमध्ये लहान आकाराच्या जवळपास हजार मूर्ती वेगवेगळ्या बॉक्‍समध्ये पॅकिंग करून पाठवल्‍या जातात. सध्या मूर्तींवर अखेरचा हात मारण्यावर तसेच तयार मूर्तीच्या पॅकिंगची कार्यशाळांमध्ये लगबग सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT