मुंबई

धनगर आरक्षणाचा मुद्दा महिनाभरात मार्गी लागेल

CD

शिवडी, ता. १० (बातमीदार) ः राज्यातील धनगर समाजबांधवांसाठी आतापर्यंत केलेल्या आंदोलनांना यश मिळणार असून आरक्षणाचा मार्ग महिनाभरात मोकळा होणार असल्याचा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आरक्षणासंबंधीचे याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केला आहे.
आरक्षणासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेतली जात आहे. या सुनावणीदरम्यान राज्य तसेच केंद्र सरकारने त्यांची बाजू खंडपीठासमक्ष मांडली. या वेळी हेमंत पाटील यांनी सादर केलेल्या पुराव्यांवर युक्तिवाद झाला. पाटील यांच्या वतीने आतापर्यंत आरक्षणासंदर्भात दोन हजार पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. आता बुधवारी (ता. १२) सरकारकडून आरक्षणासंबंधीची भूमिका स्पष्ट केली जाणार असून यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
समाजाला आरक्षण मिळाले आहे, पंरतु त्याची अंमलबजावणीच होत नसल्याने समाजबांधव आरक्षणापासून वंचित असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. धनगर आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात पाटील यांनी अनेक आंदोलने केली असून त्यांच्यावर आंदोलनासंदर्भात नऊ गुन्हे दाखल आहेत. आता या आंदोलनांना यश मिळणार असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली. राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार असल्याने समाजाची विकासाच्या दिशेने वाटचाल होणार आहे. विधानसभा निवडणुकीत समाजाचे २० आमदार निवडून येऊ शकतात, असा दावादेखील पाटील यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पीएनजी कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था; बजाजनगरमध्ये उखडलेले रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिक त्रस्त

Pune News: शासन निर्णय लवकरच! प्रवेश रद्द केल्यास शुल्क परतावा अनिवार्य; राज्य शिक्षण आयुक्तांची माहिती, पालकांना दिलासा!

Rahuri Bypoll: प्राजक्त तनपुरे यांची माघार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई, अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा?

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये वृक्षतोडीला ब्रेक; राष्ट्रीय हरित लवादाकडून २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT