मुंबई

नेरूळ स्थानकासमोर जीवाला धोका

CD

नेरूळ, ता.१०(बातमीदार)ः नेरूळ सेक्टर २० येथील रेल्वे स्थानकासमोर असलेला मार्ग अपघाताचे केंद्र बनू लागले आहे. या ठिकाणी आठवड्यातून एकदा तरी अपघातांची नोंद होत असल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानक परिसरातील दोन्ही मार्गावर तसेच सेवा रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी होत आहे.
नेरूळ रेल्वे स्थानकाचे पश्चिमेला असलेल्या स्थानकासमोरील मार्ग सतत गजबजलेला म्हणून ओळखलेला जातो. याच मार्गाला लागून नेरूळ गावात रस्ता जातो, तर मुख्य मार्गाला लागून स्थानकाजवळूनच सर्विस मार्ग जात असल्याने येथे वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र, हा चौकात सध्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरू लागला आहे. एकीकडे स्थानकाजवळ असलेल्या समांतर मार्गावरून रिक्षा मोटरसायकल चारचाकी वाहनांची सातत्याने ये जा सुरू असते. तर दुसरीकडे गुडविल सेक्टर १० मधून येणारी वाहने तेरणा रुग्णालयाकडून वाहने-जा करणारी वाहने नेरूळ गावासमोरील मार्गावर एकत्र येत असल्यामुळे तिन्ही मार्गावरील भरधाव वाहनांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. अशातच मुख्य रस्त्याच्या समांतर मार्गावरून अनेकदा रिक्षा चालक भरधाव वेगाने धावत असल्याने सेक्टर १० मध्ये स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना ब्रेक मारावे लागत आहेत. त्यामुळे हाणामारीच्या घटना झाल्या आहेत.
-----------------------------------
रिक्षाचालकांना आवरणे गरजेचे
तेरणा कॉलेज ते नेरूळ गाव रस्त्यावर गावच्या कमानी पूर्वी स्पीडब्रेकर उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे नेरूळ गावात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना धोका रोखता येईल. तसेच गुडविल चौक मच्छी विक्रेते ते दुर्गा माता मंदिराजवळील युटर्न आधी स्पीड ब्रेकर उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील समांतर रस्त्यावरून येणाऱ्या रिक्षांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येईल.
------------------------------------
या मार्गावर सातत्याने अपघात होत आहे. त्यामुळे महापालिकेने या मार्गावर स्पीड ब्रेकर उभारणे गरजेचे आहे. तसेच नेरुळ गावातील मार्गावर लहान स्पीड ब्रेकर उभारल्यास वाहनाला वेगावर मर्यादा राखणेही सहज शक्य होणार आहे.
-देवनाथ म्हात्रे, समाजसेवक, नेरुळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

SCROLL FOR NEXT