मुंबई

मिरा रोडच्या पार्किंमध्ये वाहनचालकांची लुट

CD

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेने मिरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर सुरू केलेल्या पे अँड पार्कमध्ये कंत्राटदाराकडून वाहनचालकांची लुट सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. महापालिकेने याठिकाणी वाहने उभी करण्यासाठी निश्चित करुन दिलेल्या शुल्कापेक्षा दुप्पट शुल्क कंत्राटदाराकडून वसूल केले जात आहेत. यासंदर्भात जागरुक नागरिकाने आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
वाहनचालकांच्या सोयीसाठी महापालिकेने मिरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर पे अँड पार्क सुविधा दिली आहे. हे वाहनतळ आशुतोष एन्टरप्राईजेस हा कंत्राटदार चालवत आहे. वाहतळात वाहने उभ्या करण्यासाठी महापालिकेकडून तासानुसार शुल्क निश्चित करुन देण्यात आले आहे. या शुल्कानुसारच कंत्राटदाराने वाहनचालकांकडून भाडे घ्यायचे आहे. याबाबत महापालिकेने कंत्राटदारासोबत केलेल्या करारनाम्यात तसे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पण महापालिकेच्या शुल्काच्या दरांना कंत्राटदाराने केराची टोपली दाखवून मनमानीपणे शुल्क वसुली सुरू केली आहे.
येथील रहिवासी कृष्णा गुप्ता यांनी आपली दुचाकी ८ एप्रिलला रात्री पावणे बारा वाजता या वाहनतळावर उभी केली. महापालिकेच्या दरानुसार बारा तासांसाठी कंत्राटदाराने २० रुपये घेणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदाराने त्यांच्याकडून २४ रुपये घेऊन त्याची पावती दिली. गुप्ता आपली दुचाकी घेण्यासाठी दुसऱ्‍या दिवशी दुपारी चार वाजता गेले. पण सतरा तास वाहन उभे असल्यामुळे कंत्राटदाराने चोवीस तासाचे शुल्क आकारले. महापालिकेने चोवीस तासांसाठी २५ रुपये इतके शुल्क निश्चित करुन दिले आहे. पण कंत्राटदाराने गुप्ता यांच्याकडून आणखी २४ रुपये म्हणजेच चोवीस तासांकरता एकूण ४८ रुपये शुल्क वसुल केले. गुप्ता यांनी कंत्राटदाराकडे महापालिकेने निश्चित केलेल्या शुल्काची यादी मागितली, पण कंत्राटदाराने ती दाखविण्यास चक्क नकार दिला.
कृष्णा गुप्ता यांनी त्यानंतर आयुक्त दिलीप ढोले यांना ई मेलद्वारे तक्रार पाठवली आहे. तक्रारीसोबत कंत्राटदाराने घेतलेल्या शुल्काच्या पावत्यादेखील जोडल्या आहेत.
.....
गुन्हा दाखल करण्याची मागणी
कंत्राटदाराकडून महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त वसुली सुरू असून हे करारामधील अटी शर्तींचे उल्लंघन आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करुन त्यच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी गुप्ता यांनी आयुक्तांकडे केली आहे.
....
पार्किंगमध्ये कंत्राटदाराकडून वसूल करण्यात येणारे दर आणि तेथील वस्तुस्थितीबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- कल्पिता पिंपळे, उपायुक्त, मिरा भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टांचे वंशज आता काय करतात? त्यांनी जपलेली छ. शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे पाहिलीत का?

Latest Marathi News Live Update : भारतासाठी दिलासा! ४६,५०० टन LPG घेऊन 'नंदा देवी' टँकर गुजरातच्या वदिनार बंदरात दाखल

Share Market Fraud : सावध व्हा! नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली २७ लाखांना चुना; बापलेकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT