मुंबई

शहर स्वच्छतेते महिलांचे योगदान

CD

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. १० ः नवी मुंबई महापालिकेतर्फे शहरभर राबविण्यात येणाऱ्या विविधांगी स्वच्छता उपक्रमात लोकसहभागावर व त्यातही महिलांच्या सहभागावर विशेष भर दिला जात आहे. घरातील दैनंदिन स्वच्छतेमध्ये महिला फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे सार्वजनिक स्तरावरील स्वच्छता मोहिमांमध्येही सर्व वयोगटातील महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन नेरूळ येथील महिलांच्या पिंकेथॉन या संस्थेने उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात २५ हून अधिक महिलांनी सहभाग घेत सेक्टर १९ नेरूळ येथील आरटीओ ट्रॅक भोवतालचा परिसर स्वच्छ केला होता. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून झालेल्या या उपक्रमात प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून पिंकेथॉनच्या महिलांनी एक आदर्श उभा केला. अशाच प्रकारे इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी येथील विद्यार्थ्यांनी टीएस चाणक्य सभोवतालच्या खाडी परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेऊन सागरी किनारा स्वच्छ करण्यात आला आहे. या उपक्रमातही विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या मोहिमेत खारफुटी परिसरातील कचरा, तसेच प्लास्टिक सहभागी विद्यार्थी व त्यांचे प्राध्यापक व स्वयंसेवक यांनी गोळा करून जनजागृती केली. तसेच ५० हून अधिक विद्यार्थिनी, विद्यार्थी व नागरिकांनी खाडीकिनाऱ्याचा परिसर कचराविरहित करण्याचा संकल्प तडीस नेला.
--------------------------------------------------
महिलांनी शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच आपल्या घरातूनच कचरा ३ प्रकारे वर्गीकरण करून कचरा गाडीत द्यावा. सोसायटीच्या आवारात कंपोस्ट पीट्स तयार करावेत, तसेच दैनंदिन वापरातून प्लास्टिक हद्दपार करावे.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचा पुलवामा हल्ल्याशी संबंध, मुंबईत २१ वर्षीय तरुणीला डिजिटल अरेस्ट करत ३२ लाखांना गंडा; क्रिकेटरसह ७ जणांना अटक

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवस राहणार बंद; मध्य रेल्वेचा निर्णय

Iran Israel Conflict: इराणला शस्त्रसंधी अमान्य, मध्यस्थांचा प्रस्ताव फेटाळला; अमेरिकेन तळांना केलं टार्गेट!

Jalna News: बसथांब्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांचे होताहेत हाल; जालना-वडिगोद्री महामार्गावरील प्रकार; उघड्यावरच करावी लागते बसची प्रतीक्षा

Ashok Kharat: दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए...; भोंदू अशोक खरातच्या चौकशीत धक्कादायक खुलासा! काळ्या कारनाम्याचे गुपित उघड

SCROLL FOR NEXT