मुंबई

दहिसर मधील रस्त्याची दुरवस्‍था

CD

मालाड, ता. १० (बातमीदार) ः एकीकडे मुंबई सुशोभीकरणासाठी पालिकेमार्फत कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाच दुसरीकडे शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाल्याचे दिसून येत आहेत. दहिसर पूर्वेकडील आर उत्तर विभागातील वॉर्ड क्रमांक दोनमधील छत्रपती शिवाजी मार्ग रोड क्रमांक चार या रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचारीही त्रस्‍त झाले आहेत.
दहिसर पूर्वेकडील रस्‍त्‍यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पालिकेच्‍या रस्ते विभागामार्फत पेव्हरब्लॉक टाकण्यात येत होते, त्यामुळे रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. विशेष म्हणजे मुंबई सुशोभीकरणादरम्‍यान या रस्‍त्‍याच्‍या बाजूला असलेल्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. असे असताना या मार्ग क्रमांक चारकडे पालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्‍याचा आरोप स्‍थानिकांनी केला आहे.

अन्‍य रस्‍त्‍यावरून प्रवास
मार्ग क्रमांक चारच्‍या दुरवस्‍थेमुळे अनेक नागरिक नाइलाजास्तव शक्ती नगर येथील खासगी रस्त्याने ये-जा करत आहेत.
याच रस्त्यावरून बेस्टच्या गाड्यादेखील मार्गक्रमण करत असतात. येथील गटाराच्या चेंबरचे झाकण खचल्याने अनेकदा दुर्घटना घडल्या होत्या. त्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली, परंतु रस्त्याच्या दुरुस्तीकडे मात्र लक्ष दिले जात नसल्‍याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तक्रारीकडे दुर्लक्ष?
रस्‍त्‍यावरील खड्ड्यांबाबत पालिकेच्या आर उत्तर विभागाकडे तक्रार केली होती; मात्र त्यांनी हा रस्ता आमच्या अखत्यारीत नसून रस्ते विभागाकडे बोट दाखवले आहे; तर दुसरीकडे परिरक्षण विभागाने नेहमीप्रमाणेच आपले हात झटकले आहेत. दरम्यान, सदर रस्त्याची पावसाळापूर्वी दुरुस्ती न केल्यास परिसर जलमय होण्याची भीती वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपतीच्या लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

Cash Promises Ahead of Upcoming Elections : “पैसै घ्या, मते द्या’’आदित्यनाथ आणि ट्रम्प एकाच माळेचे मणी

SCROLL FOR NEXT