मुंबई

संस्कृतीच्या संवर्धनानेच भारत विश्वगुरू होणार

CD

मुंबई, ता. १० ः आज अनेक देशांमध्ये विकासाचा वेग मंदावला आहे. युद्ध, अहिंसा याने ते त्रस्त आहेत. अशा स्थितीत संस्कृतिसंवर्धन करत असलेला भारतच त्यांना मार्ग दाखवू शकतो. त्यादृष्टीने संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद आहे, असे राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने विलेपार्ले येथील केशवराव घैसास सभागृहात आयोजित नैतिक शिक्षण योजनेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, संस्कार आणि क्रांतिवीरांचा परिचय व्हावा या हेतूने प्रतिष्ठानची नैतिक शिक्षण योजना महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि राजस्थान मधील ९१७ शाळांमध्ये सुरू आहे. त्या उपक्रमात सहभागी होऊन विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मंगल प्रभात लोढा यांच्या हस्‍ते सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी रा. स्व. संघाचे विमल केडिया, विश्व हिंदू परिषदेचे रामचंद्र रामूका, प्रतिष्ठानच्या संयोजिका अस्मिता आपटे यांची विशेष उपस्थिती होती.
जगातील अनेक देशांमध्ये प्रगतीचा वेग मंदावलेला असतानाही भारताच्या अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल सुरू आहे. दुसरीकडे जगातील अनेक देश अशांती, हिंसा, युद्ध या भोवऱ्यात सापडले आहेत. अशा स्थितीत विश्वातील मानवतेला शांतीचा संदेश देण्याची क्षमता केवळ भारतीय संस्कृतीतच आहे. त्याच संस्कृतीच्या सिंचनाचे कार्य संस्‍कृती प्रतिष्ठान करीत आहे. अशाच संस्कृती संवर्धनाच्या आधारावरच भारत विश्वगुरू होईल, असे लोढा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी

Pune News : राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना घेऊन त्याचे विश्लेषण व तुलना करावी; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज

कॅन्सरला हरवलं पण मृत्यूशी झुंज अपयशी; 'रेडी' फेम अभिनेत्री प्रवीणा देशपांडे काळाच्या पडद्याआड

Pune Crime : उद्योजकांकडून मोहजालात अडकवून खंडणी उकळणाऱ्या दाम्पत्याला अटक

Baramati News : माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामती नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक....

SCROLL FOR NEXT