मुंबई

सरकारकडून कर्मचाऱ्यांची थट्टा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना १० तारीख उलटली तरी वेतन मिळालेले नाही. सरकारने फक्त १६५ कोटी रुपयांचा सवलत मूल्य रकमेच्या परताव्याचा निधी देणे, तो निधी एसटीच्या खात्यावर जमा न होणे ही शुद्ध फसवणूक असून याला राज्य सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार आहे. राज्य सरकार संपकाळात दिलेल्या आश्वासनाकडे डोळेझाक करीत आहे, ही कर्मचाऱ्यांची थट्टा आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी महामंडळाला वेतनासाठी दरमहिन्याला ३६० कोटी रुपये इतक्या निधीची गरज असताना फक्त १६५ कोटी इतकी कमी रक्कम महामंडळाला देणे व तीसुद्धा सवलत मूल्य रकमेतून देणे ही शुद्ध फसवणूक आहे. कारण वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम बजेटमध्ये तरतूद करून देण्याचे आश्वासन सरकारने संपकाळात दिले होते. त्याकरिता स्वतंत्र निधी देणे गरजेचे असताना त्याचा विसर सरकारला पडला आहे. काही दिवसांपूर्वी शासनाच्या परिपत्रकात जाहीर केलेली १६५ कोटी रुपये रक्कम वेतनासाठी अपुरी असून ही रक्कम एसटीच्या खात्यावर अद्यापही वर्ग झालेली नाही, यामुळे कर्मचाऱ्यांना या महिन्यातसुद्धा वेतन वेळेवर मिळालेले नाही. यामुळे यापुढे महामंडळ आर्थिक सक्षम होणार नाही. शिवाय यापुढे कुठलीही विकासकामे होणार नाहीत. कदाचित डिझेलअभावी गाड्या उभ्या राहतील, अशीच परिस्थिती आहे.
...
१६५ कोटीही अपुरा निधी
१६५ कोटी रुपये इतकी रक्कम एसटीच्या खात्यावर वर्ग झाली तरी या रकमेमध्ये नक्त वेतनसुद्धा देता येणार नाही. नक्त वेतनासाठी २०५ कोटी रुपये इतका निधी लागत आहे. एसटीला व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत, असा आरोपही श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
...
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने अनियमित वेतनामुळे यापूर्वीच दावा दाखल केला आहे. न्यायालयाने देय तारखेस वेतन करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र तरीही वेळेवर वेतन मिळत नव्हते. त्यामुळे संघटनेने फौजदारी अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेऊन १६ फेब्रुवारीला दावा दाखल केला आहे. तरीही १० तारीख उलटून गेली तरी वेतन मिळाले नाही. तातडीने वेतन न झाल्यास आंदोलन उभारावे लागेल.
- संदिप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT