मुंबई

ठाण्यात आगीच्या घटनांत वाढ

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : राबोडी, खोपट आणि वागळे इस्टेट या परिसरात काही मिनिटांच्या अंतरावर वेगवेगळ्या तीन आगीच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये कुणालाही दुखापत झालेली नसून एका घटनेत तब्बल १७ मीटर बॉक्स जळून खाक झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

राबोडी नंबर २ या ठिकाणी असलेल्या सात मजली बांगी टॉवर या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील रूम नंबर ७०१ मधील इलेक्ट्रिक बोर्डला शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना रविवारी (ता. ९) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत माहिती मिळताच घटनास्थळी रूममध्ये लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक रहिवाशांनी काही मिनिटांमध्ये नियंत्रणात आणली. खोपट, हंस नगर या ठिकाणी असलेल्या चार मजली पारिजात अपार्टमेंट, ए- विंगमधील इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या मीटर बॉक्स केबिनला आग लागल्याची घटना आज (ता. १०) मध्यरात्री बारा ते सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत त्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या मीटर बॉक्स केबिनमधील एकूण १७ मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत. लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने एक वाजताच्या सुमारास नियंत्रणात आणली. तसेच वागळे इस्टेट, रूपादेवी पाडा या ठिकाणी महावितरण विद्युत केबलला किरकोळ आग लागली होती.

आज मध्यरात्री पावणेएक वाजण्याच्या सुमारास लागलेली आग एक वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी पूर्णपणे नियंत्रणात आणली. यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला होता. या तिन्ही घटनांत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: महायुतीचे उमेदवार पियुष गोयल उद्या उमेदवारी अर्ज भरणार

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT