मुंबई

गौतमी पाटीलच्या नृत्यावर बदलापूरकरांची टीका

CD

बदलापूर, ता. १० (बातमीदार) : लावणीतील नृत्यशैलीमुळे वादात सापडलेल्या गौतमी पाटील हिच्या नृत्याची मेजवानी रविवारी (ता. ९) बदलापूरकरांनी अनुभवली. एका माजी नगरसेवकाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर पूर्व खरवई परिसरातील पालिकेच्या मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिच्यासह अन्य महिला सहकलाकारांनी केलेल्या नृत्यावर काही नागरिकांनी नाराजी व्यक्त करत ‘बदलापूरचं बिहार करू नका’ असे म्हटले.

बदलापुरातील कार्यक्रमाला सर्व वयोगटातील नागरिकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी बाऊन्सर आणि बदलापूर पूर्व पोलिसांनी विशेष काळजी घेतली होती. नुकतीच अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी, गौतमी पाटील हिचे कार्यक्रम बघणे लोक थांबवत नाहीत तोपर्यंत हे असेच चालू राहील, अशी टीकादेखील केली होती. मात्र, बदलापूरसारख्या सुसंस्कृत शहरात गौतमी पाटील हिच्या नृत्यावरून सोशल मीडियापासून ते नागरिक उघडपणेसुद्धा टीका करत आहेत. राजकीय पुढाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त लावणी सम्राज्ञी असणाऱ्या महाराष्ट्रातील इतर कलाकारांचे कार्यक्रम राबवावेत आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपावी, अशा तीव्र प्रतिक्रिया शहरात उमटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

April 2026 Calendar: हनुमान जयंती, अक्षय तृतीया ते सीता नवमी; आंब्याच्या मोसमातील खास सण आणि महत्त्वाचे दिवस जाणून घ्या

सोनम कपूरच्या घरी आला गोड पाहुणा, अभिनेत्री झाली आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Satara ZP Controversy : मोठी बातमी! सातारा SP तुषार दोषींना 'सक्तीची रजा'; मंत्री शंभूराज देसाईंच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारची कारवाई

SCROLL FOR NEXT