मुंबई

खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

CD

नवीन पनवेल, ता. १० (वार्ताहर) : रोडपाली येथील बांधकाम व्यावसायिकाकडून ३५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी बाबू या व्यक्तीविरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात खंडणी आणि ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. रोडपाली येथील जीवन गायकवाड ७ एप्रिल रोजी घरी येत असताना सुधागड शाळेजवळ त्यांना परिचयाच्या धरम याच्या मोबाईलवर एक फोन आला. त्याने एकजण पैशांची मागणी करत असल्याचे सांगितले. त्यानंतर धरमचा फोन पिन्याने घेतला व जत्रेच्या बाहेर लावलेल्या स्टॉलधारकांकडून पैसे वसुली करण्यास महेश शेट्टीने सांगितले असल्याचे कळवले. काही वेळाने जीवन गायकवाड कळंबोली पेट्रोल पंप येथील जत्रेच्या ठिकाणी असताना बाबू हा तेथे आला. त्याने महेश शेट्टी, विकी देशमुख आणि पिन्या यांच्या टोळीने वसुली करण्यास पाठवले असून ३५ हजारची मागणी जीवन यांच्याकडे केली. या मागणीला नकार देत जीवन यांनी कळंबोली पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Ambajogai Crime : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर १३ वर्षाचा अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT