मुंबई

१९ वर्षीय तरुणाने वाचवले सहा जणांचे प्राण,

CD

मुंबईत ११ वे अवयवदान
१९ वर्षीय तरुणामुळे सहा जणांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईसह राज्यात अवयवदानाची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यस्तरीय अवयवदान मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत ११ वे यशस्वी अवयवदान पार पडले. एका तरुणाच्या आई-वडिलांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सहा जणांना जीवदान मिळाले.
काही दिवसांपूर्वी मिरा रोडमधील उमराव वोक्हार्ट रुग्णालयात एका १९ वर्षीय मुलाला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत घोषित केले. डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबीयांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. त्यानंतर नातेवाईकांनी तरुणाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हृदय, यकृत, फुप्फुस, स्वादुपिंड आणि दोन्ही मूत्रपिंड असे सहा अवयव दान केले आहेत. झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अवयव दान केल्याची माहिती समन्वयकांनी दिली.
दरम्यान, सरकारी आरोग्य केंद्रांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये अवयवदानाचे प्रमाण आजही कमी आहे, पण अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची प्रतीक्षा यादी सर्वच स्तरांवर वाढती असून यंदा चळवळीला गती आल्याचे चित्र आहे. मुंबईकरांनी जास्तीत जास्त अवयवदान चळवळीत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT