मुंबई

बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय समस्यांच्या गर्तेत

CD

मुंबई, ता. १० : जोगेश्वरीतील मुंबई महापालिकेचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयाविरोधातील रुग्णांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. पालिका प्रशासन तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असून त्या सोडवल्या जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरीत परिस्थितीचा दुष्परिणाम रुग्णांना भोगावा लागत असून छोट्या छोट्या उपचारांसाठीही त्यांना इतर रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे.

अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून पश्चिम द्रुतगती मार्गावर कोटींचा खर्च करत ३०४ खाटांचे ट्रॉमा रुग्णालय उभारण्यात आले, पण अपघाताचे रुग्ण वगळता इतर कोणतेही छोटे-मोठे उपचार इथे तात्काळ मिळत नसल्याची तक्रार वारंवार होत आहे. कान- नाक- घशाने त्रस्त रुग्ण, गर्भवती महिला, लहान मुले आणि नेत्रविकाराबाबतचे उपचार आणि सुविधा इथे अपुऱ्या पडत आहेत. इथे योग्य सुविधा उपलब्ध झाल्यास कूपर रुग्णालयावरील भार थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

रुग्णालयात येणारे रुग्ण अनेक असुविधांचा सामना करीत असून तेथील तक्रारींचा पाढा नुकतेच स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांनी वाचला. रुग्णालयातील आरोग्याबाबतच्या असुविधांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची चणचण तात्काळ सोडवावी, अशा सूचना वायकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्याशी बैठक घेऊन केल्या आहेत.

कार्डिॲक विभागाची मागणी
कोविड काळ सुरू झाल्यापासून शिवाय गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याने ट्रामा रुग्णालयाच्या नजीकच्या परिसरातील गोरगरीब रुग्णांची उपचारांसाठी धावाधाव होत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पालिका रुग्णालयात तात्काळ कार्डिॲक विभाग सुरू करण्यात यावा. तसा प्रस्ताव तयार करून पालिकेच्या आयुक्तांकडे पाठवण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

पॅथॉलॉजी लॅबमधून अहवाल मिळण्यास उशीर
रुग्णालयातील पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणी केल्यास अहवाल मिळण्यास दोन ते तीन दिवस जातात. परिणामी, अनेकदा रुग्णांना बाहेरून तपासण्या सुचवल्या जातात. त्यामुळे रुग्णालयाजवळ प्रयोगशाळेची सोय करून रुग्णांना किंवा नातेवाईकांना तपासणीसाठी तिथे पाठवण्यात यावे, प्रयोगशाळेने रुग्णांकडून पैसे न घेता पालिकेने ते शुल्क भरावे, ट्रॉमा रुग्णालय असल्याने ऑर्थोपेडिक बेडच्या संख्येत वाढ करावी, रुग्णालयात काही ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावे इत्यादी सूचना रवींद्र वायकर यांनी केल्या आहेत.

कंत्राटी कामगारांच्या पगाराबाबत निर्देश
कंत्राटी कामगारांचे पगार दोन ते तीन महिन्यांपासून रखडले आहेत. आयसीयू विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांनाही पगार मिळालेला नाही. कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यानुसार पगार, वेतन स्लीप व भविष्य निर्वाह निधी भरल्याची पावती द्यावी, अशी ताकीद रुग्णालय प्रशासन आणि कंत्राटदाराला रवींद्र वायकर यांनी दिली आहे. कोविड भत्ता आणि इतर सुविधाही मिळत नसल्याची तक्रार कर्मचारी करत आहेत.

रुग्णालयात खाटांच्या गरजेनुसार ते पुरवले जातील. ज्या विभागांमध्ये कर्मचारी, खाटा आणि इतर सुविधा अपुऱ्या आहेत, तिथे त्या पुरवल्या जातील.
- डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

HSC Exam Result : अंध मुलींचे बारावी परीक्षेत यश; जागृती स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा फॉर ब्लाइंड गर्ल्सचा १००% निकाल कायम

Who is Raghu Sharma? मुंबई इंडियन्सने क्रीडा आहारतज्ज्ञ अन् ट्रेनरला दिली पदार्पणाची संधी; CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

HSC Exam Result : बारावी निकालात सलग दुसऱ्या वर्षी घट; मंगळवेढ्याचा निकाल 80 टक्के

SCROLL FOR NEXT