मुंबई

पालिकेच्या शाळा होणार सुरक्षित

CD

पालिकेच्या शाळा होणार सुरक्षित
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता सीसी टीव्हीचा वॉच

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी आणि आवार सुरक्षित होण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सर्व शाळांच्या आवारात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
पालिकेच्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या ११५० शाळांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता इंग्रजी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा पालिकेने सुरू केल्या आहेत. ‘मुंबई पब्लिक स्कूल’ नावाने त्या सुरू आहेत. पालिकेच्या शाळांमध्ये आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जाते.
पालिकेच्या अनेक शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आहे. स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा वावरही शाळांच्या आवारात असतो. पालिकेतर्फे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजना राबवण्यात येत असून एक कोटी रुपयांतून शाळांच्या आवारात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिका शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, शाळेचा परिसर आणि इतर सुविधा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने कार्यकारी अभियंता (विद्युत व यांत्रिकी) प्रकल्प व्यवस्थापक सल्लागारांची नियुक्ती केली आहे. सीसी टीव्हीसाठी एक कोटी रुपये इतका खर्च केला जाईल, अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

अमरावतीत गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहकाच्या नावे परस्पर सिलिंडरची उचल, विना बुकिंग 'डिलिव्हरी'चा येतोय मेसेज

Sports News: महाराष्ट्रात कुस्ती पंचगिरीची परिस्थिती: तुटपुंजे मानधन आणि अवहेलनेमुळे आव्हाने

Latest Marathi News Live Update : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

SCROLL FOR NEXT