मुंबई

पालघर तालुक्याच्या आमसभेला मुहुर्त

CD

पालघर, ता. १० (बातमीदार) : तालुक्याची वार्षिक आमसभा शुक्रवारी (२८ एप्रिल) पालघर येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी भवन हॉल येथे आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेला आमदार श्रीनिवास वनगा सहअध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना विविध विभागांशी संबंधित असलेल्या कामांबाबत काही सूचना, प्रस्ताव असल्यास त्या १७ एप्रिलपर्यंत पंचायत समिती कार्यालय पालघर येथे कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करावेत. तसेच आयत्या वेळच्या विषयात काही ठराव, प्रस्ताव असल्यास ते सभेपूर्वी सात दिवस अगोदर या कार्यालयात द्यावेत, असे आवाहन पालघर पंचायत समितीकडून करण्यात आले आहे.
.....
विरारमध्ये रोजगार मेळावा
वसई (बातमीदार) : विरार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून शुक्रवारी टोटाळे तलावाजवळील महापालिका वाचनालय इमारत येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात बँक, इन्शुरन्स, सेल्स मार्केटिंग, फिल्ड वर्क प्रमोटर, सिक्युरिटी गार्ड, बॅंक ऑफिस, डाटा एन्ट्री, टेलीकॉलर अशा विविध क्षेत्रात नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT