मुंबई

अंधेरीतील ज्येष्ठाची ऑनलाईन फसवणूक

CD

मुंबई, ता. १० : अंधेरीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची बनावट ई-मेलद्वारे ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या सायबर टोळीतील सदस्याने अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांची पत्नी रुला गनी असल्याचे भासवले होते. ज्येष्ठ नागरिक पेशाने अकाऊंटंट आहेत. भारतीय बाजारपेठेत मोठी गुंतवणूक करण्यासाठी त्यांना अकाऊंटंटची गरज असल्याचे सांगत या ज्येष्ठ नागरिकाला गंडा घालण्यात आला.
त्यांना १८ फेब्रुवारीला ई-मेल प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये ई-मेल पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख रुला घनी अशी सांगून आपण अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांची पत्नी असल्याचा दावा केला. पीडित व्यक्तीकडे भारतात पैसे गुंतवण्यासाठी मदत मागितली. त्यानंतर बँकेत खाते उघडण्यासाठी ३० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. पुन्हा परदेशी बँक खाते स्थानिक खात्यात रूपांतरित करणे आवश्यक आहे आणि त्याला त्यासाठी ४.७९ लाख रुपये रूपांतरण शुल्कदेखील भरावे लागेल असे सांगितले. तक्रारदाराने अट मान्य करत रक्कम भरली. तरीही त्याच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित झाले नाहीत. त्यानंतर पाठपुरावा केल्यावर ४ एप्रिलला एक आफ्रिकन नागरिक तक्रारदाराकडे आला. त्याने त्याला २२ दशलक्ष रोख भरलेली काळी बॅग दिली. तसेच ३.२० लाख रुपये बेलीकडे हस्तांतरित केल्यानंतरच बॅगचे कुलूप उघडण्यास सांगितले. बॅग उघडून पाहिले असता त्यात कागदांचे बंडल निघाले. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT