मुंबई

कंत्राटदारांच्या भल्यासाठी खड्डे भरण्यास तिप्पट दर!

CD

मुंबई, ता. १० ः मुंबईतील रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी ४० कोटी रुपये खर्च केला जात असताना यंदा मात्र मुंबई महापालिकेने पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी तब्बल सव्वाशे कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. हा तिप्पट दर कंत्राटदारांचे भले करण्यासाठी असल्याचा आरोप महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
दरवर्षी पावसाआधी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरू केले जाते. यंदाही या कामासाठी १२५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पश्चिम उपनगर ८४ कोटी रुपये, पूर्व उपनगर २८ कोटी रुपये आणि शहर विभागासाठी १४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. रॅपिड हार्डनिंग काँक्रीटद्वारे खड्डे भरण्यासाठी ८० कोटी रुपयांची आणि अस्फाल्टद्वारे खड्डे भरण्यासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मागील वर्षी मात्र ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यंदा ही रक्कम वाढल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. खड्डे कुठे पडणार हे प्रशासनाला माहिती आहे का, ही महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी आहे. कंत्राटदारांच्या भल्यासाठी ही रक्कम वाढवण्यात आली आहे का, असा सवाल विचारत या कामाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणीही रवी राजा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT