मुंबई

फिनटेकची शेतकऱ्यांसाठी ‘एअर पे’ योजना

CD

मुंबई, ता. १० : डेअरीमध्ये दूध किंवा एपीएमसीमध्ये शेतमाल देणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या मालाचे पैसे तात्काळ मिळू शकतील, अशी योजना फिनटेक कंपनी ‘एअर पे’ने आणली असून त्याचा पहिला प्रयोग त्यांनी मध्य प्रदेशात सुरू केला आहे.

एअर पे कंपनीचे चीफ बिझनेस ऑफिसर सुलभ टंडन यांनी आज येथे ही माहिती सकाळला दिली. विशेषतः कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल देणाऱ्या शेतकऱ्यांना मालाचे तुटपुंजे पैसेही काही महिन्यांनंतर मिळतात असा अनुभव आहे. त्यामुळे या तंत्रामुळे निदान या त्रासातून तरी शेतकऱ्यांची सुटका होण्यास मदत होईल. एअर पे कंपनीतर्फे आधार फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनच्या आधारे आपल्या प्रतिनिधी म्हणजेच व्यापाऱ्यांमार्फत पेमेंट केले जाते. पोस्टाच्या मनीऑर्डरप्रमाणे आपण येथील एअरपेच्या प्रतिनिधींकडे (व्यापाऱ्यांकडे) पैसे भरले की ते देशाच्या कानाकोपऱ्यात जेथे एअरपेचा प्रतिनिधी (व्यापारी) असेल तेथून आपले नातलग ते पैसे काढू शकतात. याच तत्त्वावर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे त्वरेने देण्याची व्यवस्था केली जाईल. सध्या कंपनीने भोपाळ मिल्क फेडरेशनबरोबर यासंदर्भात करार केला असून ही पेमेंट यंत्रणा त्यांनी डिजिटल केली आहे. त्यामुळे तेथे दूध उत्पादकांना लगेच पैसे मिळतात. हा प्रकल्प महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये दुधाबाबत तसेच शेती उत्पादनात आणण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे टंडन म्हणाले.

..........

सरकारी सेवाही खुल्या
केंद्र सरकारच्या उमंग पोर्टलवरून पॅन, आधार, परीक्षांचे निकाल आदी विविध पाचशे सेवा सर्वसामान्यांना देणारी एअर पे ही पहिलीच फिनटेक कंपनी आहे. त्याचप्रमाणे अन्य काही राज्यांच्या पोर्टलवरूनही अशा सेवा प्रतिनिधींमार्फत मिळू शकतात. आम्ही त्या सेवा नि:शुल्क देतो; मात्र व्यापारी त्यासाठी काही शुल्क घेऊ शकतात असेही टंडन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळा खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

Latest Marathi News Live Update : शरद पवार आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर, काय आहे कारण?

'हा कसला फालतूचा अ‍ॅटिट्यूड' काजोल पापाराझींवर भडकल्याने नेटकरी संतापले, Viral Video

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

SCROLL FOR NEXT