मुंबई

४९ जणांना पोलिस कोठडी

CD

नालासोपारा, ता. १० (बातमीदार) : विरारमध्ये एका हायप्रोफाईल कॉल सेंटरचा पोलिसांनी भांडाफोड करत ४९ जणांना अटक करून त्यांच्याकडून १६ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कॉल सेंटरमधून इन बाऊंड कॉलवरून, पेपल ऑस्ट्रेलिया बँकेच्या ग्राहकांचे येणारे कॉल स्वीकारून, माहिती चोरून मोठी फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना सोमवारी (ता. १०) वसई न्यायालयात हजर केले असता त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली आहे.

विरारमधील राजोडी समुद्र किनाऱ्यावरील ‘ओएसी पेंट बॉल अरेना’ या फार्महाऊसमध्ये परराज्यांतील तरुण-तरुणी बोगस कॉल सेंटर चालवून ऑस्ट्रेलियन स्थित एका बँकेच्या ग्राहकांची फसवणूक करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याणराव करपे यांना मिळाली होती. यावरून पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. ९) या ठिकाणी सापळा रचून छापा टाकला असता या आंतराष्ट्रीय बोगस कॉल सेंटरचा भांडाफोड झाला. या ठिकाणी ३७ पुरुष, १० महिला काम करताना आढळून आल्या. अटक केलेले सर्व जण हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशचे असून ते उच्चशिक्षित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT