मुंबई

पाणथळ परिसराची अस्वच्छतेतून मुक्ती

CD

खारघर, ता. १२ (बातमीदार) : खारघरमधील सेक्टर १६ आणि १७ मधील पाणथळ आणि खारफुटी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून ७०० किलो प्लास्टिकचा कचरा गोळा करून पालिकेच्या घनकचरा विभागाकडे देण्यात आला आहे. या मोहिमेत खारघर, नेरूळ, सीबीडी, सानपाडा, पनवेल परिसरातील पन्नासहून अधिक पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते.
खारघर, सेक्टर आठ, दहा तसेच सिडकोच्या सेक्टर सोळा वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहनिर्माण सोसायटीच्या मागील बाजू तसेच संजीवनी इंटरनॅशनल स्कूलकडून रांजणपाडा, ओवेपेठ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत जवळपास तीन किलोमीटर खारफुटी आणि पाणथळ जमीन आहे. या जमिनीवर काहींनी अतिक्रमण करून झोपड्या उभारल्या आहेत. पाणथळ जागी हिवाळ्यात देश-विदेशातील स्थलांतरित पक्ष्यांची रेलचेल असते; पण या परिसरात जमिनीवर मोठ्या प्रमाणात रिकाम्या पाण्याच्या तसेच दारूच्या बाटल्या, जैविक कचरा असल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे.
------------------------------
‘या’ संस्थांचा उल्लेखनीय सहभाग
खारघर वेटलँड अँड हिल ग्रुप, मुंबई प्लॉगर्स, रोटरी क्लब ऑफ खारघर, लायन्स क्लब ऑफ सीबीडी, इख्तियार, डिव्हाईन फाऊंडेशन, फिशरमेन ग्रुप अशा विविध गटातील पर्यावरणप्रेमींनी एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनने हा उपक्रम राबवून ७०० किलो घनकचरा गोळा केला आहे.
-----------------------------------------------------
खारफुटीच्या पट्ट्यात डेब्रिज टाकण्यात आल्याचे दिसून आले. तसेच खारफुटी परिसरात बंधारा आणि बेकायदा झोपड्यांजवळून दारूच्या बाटल्या गोळा केल्या आहेत. त्यामुळे खारफुटीच्या संरक्षणासाठी मोहिमेत सहभागी झालो.
- धर्मेश बारई, संस्थापक, खारफुटी सफाई सैनिक
--------------------------------------
खारघरला निसर्गाने पाणथळ, खारफुटी परिसर दिला आहे. खारफुटी भागात टाकण्यात आलेला जैविक कचरा परिसर खराब करीत आहे. तसेच थर्माकोलसह दारूच्या बाटल्या, प्लास्टिकसह मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे.
- ज्योती नाडकर्णी, पर्यावरणप्रेमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT