मुंबई

चांबळ्याचा देशी पांढरा कांदा बाजारात

CD

वाडा, ता. १२ (बातमीदार) : ज्याची दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने वाट पाहिली जाते, असा औषधी गुणधर्म असलेला वाडा तालुक्यातील चांबळे येथील प्रसिद्ध पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे. शेतातून कांदा काढून सुकवून त्याच्या माळा बनवून विक्रीस बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. या वर्षी कांद्याचे पीकही उत्तम आल्याने शेतकरी आनंदित आहे.
भातपीक कापणी झाल्यानंतर पांढरा कांदा लागवडीला सुरुवात होते. वाडा तालुक्यात चांबळा, डाकिवली, असनस, चिखला, गातेस केळठण या काही मोजक्याच गावात पांढरा कांदा लागवड केला जातो. पांढऱ्या कांद्याला पोषक वातावरण आणि पारंपरिक लागवड यामुळे आजही पांढरा कांदा आपले औषधी गुणधर्म टिकवून आहे. बाजारात या कांद्याला मोठी मागणी आहे. तालुक्यात प्रामुख्याने चांबळे, डाकिवली, केळठण या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जात असे. त्यानंतर तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले. अभ्यासकांच्या माहितीनुसार, या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत. कांद्यात मिथाईल सल्फाईड अमिनो अॅसिड हे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

------------------
पोषक वातावरणाचा फायदा
यावर्षी तालुक्यात बऱ्यापैकी पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. यंदा पडलेली थंडी ही पांढऱ्या कांद्याला पोषक ठरली आहे. त्यामुळे यंदा कांद्याचा आकार थोड्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे यंदा पांढऱ्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. शेतात कांदा तयार झाला असून, शेतकरी काढणी करीत आहे. कांदा काढल्यानंतर उन्हात दहा ते पंधरा दिवस सुकवला जात आहे. त्यानंतर घरी आणून मजुरांमार्फत त्यांच्या माळा बांधल्या जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT