मुंबई

पर्यावरणपूरक पळसाच्या पत्रावळी हद्दपार

CD

विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) : घरात धार्मिक कार्यानिमित्त जेवणावळीसाठी झाडांच्या पानांपासून पत्रावळी वापरण्यात येत असत; मात्र गेल्या काही वर्षांत प्लास्टिक आणि थर्माकोलच्या पत्रावळींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही प्रदूषणात वाढ होत आहे.

ग्रामीण भागात पळसाची पाने सुकवून त्याच्यापासून पत्रावळी बनवण्यात येतात. लग्नसमारंभ, तसेच अन्य धार्मिक कार्यातील जेवणासाठी मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होत असे; मात्र या पत्रावळ्या गेल्या काही वर्षांत शहरानंतर विक्रमगडसारख्या ग्रामीण भागातूनही हद्दपार झाल्या आहेत. लग्न समारंभात पळसाच्या पत्रावळींची जागा आता थर्माकोलने घेतली आहे.

अलीकडच्या काळात वृक्षतोड आणि हायटेक जीवन पद्धतीमुळे पळस, कुडाच्या पानांपासून पत्रावळी बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पितृपंधरवाड्यात जेवणाचा मान पळसाच्या पत्रावळीचा होता. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात त्या मिळत होत्या. मात्र, आता बाजारात त्या दिसेनाशा झाल्या आहेत. पळसाच्या पानांच्या द्रोणांसह पत्रावळी हद्दपार झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पत्रावळीवर जेवण आरोग्याला हितकारक
सध्या कागदी पानांच्या व थर्माकोलच्या पत्रावळी, प्लास्टिकचे ग्लास ग्रामीण भागात याचा सर्रास वापर सुरू आहे. याचा वापर पर्यावरण आणि मानवी आरोग्याला घातक आहे. केळीच्या, पळसाच्या पत्रावळीवर जेवण आरोग्याला हितकारक आहे. पळसाच्या पानावर जेवणावळी घातल्या जात होते, हे आता फक्त सांगण्यापुरतेच आहे, असे विक्रमगड येथील जाणकार गजानन पाटील यांनी सांगितले.

ग्रामीण भागात धार्मिक कार्यक्रमात जेवणावळीसाठी जंगलातून पळस, कुडा झाडाची पाने तोडून आणून सायंकाळी घरात मंडळी एकत्र बसून पत्रावळी तयार करून घेत असत. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांची जागा थर्माकोल, प्लास्टिकच्या पत्रावळींनी घेतली आहे.
- माणिक सांबरे, ज्येष्ठ नागरिक, विक्रमगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT