मुंबई

श्रीसदस्यांचा उत्साह शिगेला

CD

खारघर, ता. १३ (बातमीदार) : खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठीच्या तयारीला वेग आला आहे. राज्यभरातून जवळपास वीस लाख श्रीसदस्य खारघरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे, तर या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी श्रीसदस्यांमधील उत्साह आत्तापासूनच शिगेला पोहोचला आहे.
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारावेळी खारघरमधील कार्यक्रमासाठी येणाऱ्या सदस्यांची गैरसोय होणार नाही. यासाठी श्री सदस्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्याला पंचक्रोशीतून लाखोंच्या संख्येने श्रीसदस्य येणार आहेत. गाव, शहर अशा होत असलेल्या बैठकीत श्रीसदस्यांना कार्यक्रमाची रूपरेषा, वाहनतळ, कोणत्या वाहनातून प्रवास करावा, कार्यक्रमास्थळी पोहोचल्यावर चुकामुक होऊ नये यासाठी आपल्या गट अथवा गाव, विभाग आणि वाहनतळाचे ठिकाण क्यूआर कोडसह माहिती सदस्यांना दिली जात आहे. विशेष म्हणजे, दूरवरून येणाऱ्या सदस्यांचे एक अथवा दोन दिवस दिवस खर्ची होणार आहे. त्यामुळे श्रीसदस्यांनी सोबत चटणी भाकरी, पाणी बॉटल घेऊन यावे, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवास आणि उन्हामुळे चक्कर, मळमळ वाटल्यास आवळा, जिरा, खडीसाखर, कोकम सरबत आदी सोबत ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय खारघरमधील कार्यक्रमासाठी बस तसेच रेल्वे मार्गाबाबतदेखील विविध प्रकारच्या सूचना सदस्यांना दिल्या जात आहेत. तसेच दूरवरून येणाऱ्या सदस्यांची रात्रीची गैरसोय होऊ नये, म्हणून ग्रामविकास भवन या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. तसेच ही जागा अपुरी पडणार असल्यामुळे खारघरमधील काही जिल्हा आणि खासगी शाळा तसेच काही व्यक्तींच्या घरीदेखील श्रीसदस्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
-------------------------------------------------------
प्रशासनाकडून चोख व्यवस्था
या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात श्रीसदस्य येणार असल्यामुळे खारघर सेक्टर ३५ समोरील पेठपाडा मेट्रो स्थानक शेजारी एक दिवसासाठी तात्पुरत्या स्वरूपात २५ हजार स्वच्छतागृहे उभारली जात आहेत. स्वच्छतागृहातून दुर्गंधी होणार नाही. यासाठी विशिष्ट केमिकलचा उपयोग केला जाणार आहे. तसेच कार्यक्रमास आलेल्या नागरिकांची पिण्याचे पाण्याची गैरसोय होणार नाही, याची काळजी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने घेतली आहे.
-------------------------------------------
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील जवळपास तीन हजार सदस्य स्वतः हून कार्यक्रमस्थळी स्वच्छतेसाठी श्रमदान करीत आहे. ही एक जनसेवा आहे.
-सचिन पाटील, श्रीसदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT