Cancer Treatment  sakal
मुंबई

Cancer Treatment : दुर्मिळ कर्करोगातून वृद्धेला जीवदान

सायटोरिडक्टिव्ह शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीद्वारे उपचार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुलुंड येथील ७१ वर्षीय महिलेवर फेलोपियन ट्यूबच्या अत्यंत दुर्मिळ कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिलेवर सायटोरिडक्टिव्ह शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी करण्यात आली.

रजोनिवृत्तीपश्चात रक्तस्त्राव होत असल्याची तक्रार घेऊन सदर महिला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल झाली होती. तपासणीनंतर रुग्णाला फेलोपियन ट्यूब कर्करोग झाल्याचे समजले. फेलोपियन ट्यूब अर्थात अंडवाहिनी हा महिलांच्या प्रजननसंस्थेचा एक भाग असून तो अंडाशय आणि गर्भाशयाला जोडतो.

कुटुंबात स्तनांचा कर्करोग किंवा अंडाशयाच्या कर्करोगाचा पूर्वेतिहास असणाऱ्या किंवा बीआरसीए गुणसूत्रे असलेल्या महिलांना फेलोपियन ट्यूब कर्करोग होण्याचा धोका असतो. हा कर्करोग कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो; मात्र ५०-७० वर्षे वयोगटातील महिलांना सर्वाधिक धोका असतो.

सोनोग्राफीदरम्यान सदर वृद्धेच्या फेलोपियन ट्यूबमध्ये मांसाचा गोळा आढळला. त्यावर एमआरआय आणि स्कॅनिंग केले असता त्यात दुर्मिळ फेलोपियन ट्यूब निओप्लाझम (गाठ) असल्याचे दिसून आले. सायटोरिडक्टिव्ह शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीद्वारे ही गाठ काढण्यात आली.

रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गातून रक्तस्राव होण्याचा प्रकार या वृद्धेच्या बाबतीत एकदाच झाला होता. एमआरआयमध्ये उजव्या फेलोपियन ट्यूबमध्ये गाठ आढळली. फ्रोझन/क्विक बायोप्सीद्वारे ही गाठ काढली. ही गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाले.
- डॉ. सोनल कुमता, गायनॅकोलॉजिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT