मुंबई

‘गंगा भगीरथी’चा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी

CD

मुंबई, ता. १४ : राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळावा म्हणून त्यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ (गं.भा.) असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाच्या सचिवांना केली आहे. या प्रस्तावाला समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला असून, तो अमलात आणू नये अशी मागणी आमदार रईस शेख यांनी प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.

गंगा भगीरथी संबोधन फार पूर्वी विधवा महिलांसाठी वापरले जायचे. स्रियांमध्ये समानता आणण्यासाठी महिला संघटनांनी लढा दिल्यानंतर आज सर्वच महिलांना ‘श्रीमती’ हे संबोधन वापरले जाते. ते आता प्रचलितदेखील झाले आहे. असे असताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने स्रीच्या आयुष्यात पती असण्या-नसण्यावरून भेद करावयाचे ठरवले आहे. विधवा महिलेला ‘गंगा भगीरथी’ शब्द रुढ करण्याचा घाट हा बुरसटलेल्या पुरूषी मानसिकतेचा आहे, असा आक्षेप रईस शेख यांनी प्रधान सचिवांना दिलेल्या पत्रातून घेतला आहे. त्यामुळे या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT